वडगाव मावळ - मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील लाखो मराठा बांधव मुंबई येथे आंदोलन करण्यासाठी गुरुवारी मावळ मधून मार्गस्थ झाले. दिवसभर मराठा बांधवांच्या वाहनांची रीघ लागल्याने पुणे-मुंबई महामार्गाला भगव्या लाटेचे स्वरूप प्राप्त झाले होते.