तळेगाव स्टेशन - आज महाराष्ट्र अस्वस्थ आहे. आमच्या मराठी भाषेवर, मुंबईवर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या बादशहांची नजर पडते आहे. हे बादशहा आमची भाषा, संस्कृती, साहित्य गिळायला निघालेत. अशा या अरिष्ठाच्या कठीण काळात लेखकांनी, कलावंतांनी, सर्वानी काळाची हाक म्हणून, पावित्र्य जपून आपली मराठी भाषा, संस्कृती सांभाळायला हवी असे आवाहन जेष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांनी केले.