esakal | पिंपरी : हाथरस घटनेच्या निषेधार्थ रविवारी मशाल महारॅली 
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी : हाथरस घटनेच्या निषेधार्थ रविवारी मशाल महारॅली 

मिलिंद नगरमधील महर्षी वाल्मीकी मंदिरापासून सायंकाळी सहा वाजता ही रॅली काढण्यात येईल.

पिंपरी : हाथरस घटनेच्या निषेधार्थ रविवारी मशाल महारॅली 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : हाथरस घटनेच्या निषेधार्थ आणि आई-बहिणींच्या सन्मानार्थ मेहतर वाल्मीकी समाज पुणे, पिंपरी-चिंचवड सर्वपक्षीय नागरिक, आंबेडकरी, अल्पसंख्याक व दलित पक्ष संघटना यांच्या वतीने रविवारी (ता. 11) मशाल महारॅलीचे आयोजन केले आहे. मिलिंद नगरमधील महर्षी वाल्मीकी मंदिरापासून सायंकाळी सहा वाजता ही रॅली काढण्यात येईल. पिंपरीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. 

अकरावी प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यार्थी, पालकांचा जीव टांगणीला 

यावेळी माजी आमदार विलास लांडे पाटील, ऍड. गौतम चाबुकस्वार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, शिवसेना शहर प्रमुख योगेश बाबर, रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष सुरेश निकाळजे, माजी नगरसेवक अरुण टाक, धनराज बिर्दा, काळूराम पवार, वंचित विकास आघाडीचे अनिल जाधव, कष्टकरी पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे, रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे, राजू परदेशी, अनिता साळवे, कुल जमाती तंजीमचे मौलाना नय्यर नूरी, माधव मुळे, राम बनसोडे, प्रमोद क्षीरसागर, मोहन कुंडीया उपस्थित होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

माजी आमदार लांडे म्हणाले, "हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाचा निवृत्त तीन सदस्यीय समितीकडे द्यावा. या समितीत किमान एक सदस्य महिला न्यायाधीश असाव्यात. तसेच सर्व न्यायालयीन प्रक्रिया उत्तर प्रदेशाच्या बाहेर करावी. पिढीत कुटुंबीयांची योगी सरकारने केलेल्या कैदेतून सुटका करून त्यांचे महाराष्ट्रात पुनर्वसन करावे आणि त्यांना 'वाय' दर्जाची सुरक्षा पुरवावी,'' अशी मागणी माजी आमदार चाबुकस्वार यांनी केली. 

डंबाळे म्हणाले, "अशा प्रत्येक घटनेतील दोषींना फाशी झालीच पाहिजे. पीडित कुटुंबीय व साक्षीदारांना पोलिस संरक्षण द्यावे आणि या घटनेचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या तीन सदस्यीय समितीमार्फत करावा.''