

Poor Planning Alleged After Traffic Gridlock in Pimpri MIDC Area
sakal
पिंपरी : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) क्षेत्रातील चाकण टप्पा क्र. १ व २ मधील महाळुंगे पोलिस चौकी, इंड्युरन्स कंपनी चौक ते एच.पी. कंपनी चौक या रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू झाले आहे. परिणामी, एक मार्गिका बंद करण्यात आली. त्यामुळे वाहतुकीची गती मंदावून सतत कोंडी होत आहे. अर्धा ते एक किलोमीटर अंतर कापण्यासाठी एक ते दीड तास लागत आहे. त्यावर वाहतूक पोलिस आणि ‘एमआयडीसी’ प्रशासनाच्या नियोजनामुळे वाहन चालकांनी संताप व्यक्त केला आहे.