Video : दापोडीत गादी कारखान्याला आग; दिवाळीसाठी भरलेला माल जळाला

सकाळ वृत्तसेवा
Monday, 2 November 2020

दापोडी येथील बुद्धविहार परिसरासमोर सोमवारी (ता. 2) दुपारी श्री गणेश गादी कारखान्याला आग लागली.

जुनी सांगवी (पिंपरी चिंचवड) : दापोडी येथील बुद्धविहार परिसरासमोर सोमवारी (ता. 2) दुपारी श्री गणेश गादी कारखान्याला आग लागली. त्यात दुकानातील मशिनरी, कापड आणि कापूस याचे नुकसान झाले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

दुकानमालक नानासाहेब जाधव म्हणाले, "शॉर्टसर्किटमुळे आग लागली. दिवाळी सणामुळे नुकताच नवीन माल भरला होता. मशिनरी, मोटार, वायरिंग कापड, असे एकूण दोन ते अडीच लाखांचे नुकसान झाले.'' स्थानिक रहिवाशांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती कळताच अग्निशामक दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग आटोक्‍यात आणली.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्थानिक रहिवासी अतुल काटे, इक्‍बाल फरीद खान, संजय पात्रे, राजेंद्र काटे, मुस्ताक मन्सुरी, मधुकर चौधरी, दीपक पवार यांनी आग आटोक्‍यात आणण्यासाठी प्रयत्न केले. ऐन दिवाळीचा सण तोंडावर आला असताना, मोठे नुकसान झाल्याचे दुकानमालक जाधव यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mattress factory fire in Dapodi