Maval Farmers : मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने पाणंद रस्ते खुले करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून, आता शेतकऱ्यांना शेतात मोफत पोलिस बंदोबस्तासह सहज प्रवेश मिळणार आहे.
तळेगाव दाभाडे : पाणंद रस्ते खुले करण्याबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाचे मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे. या निर्णयामुळे तालुक्यातील ३० वादग्रस्त रस्ते खुले करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात पोहोचणे सोपे झाले आहे.