‘काळेवाडी परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्या ’

‘काळेवाडी परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्या ’

वाकड, ता. १० ः काळेवाडीतील विजयनगरमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी आगीची घटना घडली. सुदैवाने यामध्ये जीवित हानी झाली नसली तरी देखील या घटनेमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने कठोर नियमावली राबवत उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. लोकशाही सामाजिक संस्थेने आयुक्तांकडे निवेदनाद्‍वारे ही मागणी केली आहे.

विजयनगर परिसरात नियम धाब्यावर बसवून सर्वसामान्यांचा जीव धोक्यात घालून येथे अनधिकृत गोडाऊन उभारण्यात आले आहेत, त्या ठिकाणी सुरक्षा उपाययोजना काय आहेत याची खातरजमा महापालिकेने करून तशी कल्पना जनतेला द्यावी. येथील काही नागरिक बेकायदेशीरपणे गोडाऊन उभारून भाड्याच्या हव्यासापोटी सुरक्षितता राम भरोसे सोडून गोडाऊन भाडे तत्त्वावर देतात. अशांना फायर ब्रिगेडची ना हरकत प्रमाणपत्राची अट आवश्यक करावी, नागरिकांची सुरक्षा लक्षात घेता आपण लवकरात लवकर पावले उचलाल अशी अपेक्षा आहे. असे निवेदनात म्हटले आहे. लोकशाही सामाजिक संस्थेचे अध्यक्ष इरफान शेख म्हणाले, ‘‘काळेवाडी रहिवासी झोनमध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत गोडाऊन झाले आहेत. कोणत्याही सुरक्षा उपाययोजना न करता गोडाऊन उभारण्यात आलेले आहेत.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com