बेलाच्या झाडाचे हे औषधी गुणधर्म तुम्हाला माहिती आहेत का?

मिलिंद संधान
Monday, 27 July 2020

दरवर्षी श्रावणात व महाशिवरात्रीला महादेवाच्या पुजेसाठी बेलाची पाने भाविकांकडून वाहिली जातात. त्यामुळे बेलाचे झाड आपल्याला परिचयाचे आहे.

नवी सांगवी (पिंपरी-चिंचवड) : भगवान शंकराच्या पुजेसाठी आपण बेलाचे पान वाहतो. दरवर्षी श्रावणात व महाशिवरात्रीला महादेवाच्या पुजेसाठी बेलाची पाने भाविकांकडून वाहिली जातात. त्यामुळे बेलाचे झाड आपल्याला परिचयाचे आहे. परंतु, त्याची पाने आणि फळात विविध औषधी गुणधर्म आहेत. हे फारच कमी लोकांना ज्ञात आहे. दुर्देवाने बेलाचे झाडी दुर्मिळ होत चालल्याचे चित्र सध्यातरी सर्वत्र पहायला मिळते. सध्या पर्यावरण संवर्धन करण्यात आपण सर्वच बाजूंनी जागृत जरूर झालो आहोत. दरवर्षी वृक्षारोपणही मोठ्या प्रमाणात केले जात आहे. दीर्घायुषी व अनंत काळ तग धरणारी वड, पिंपळ, आंबा व चिंच यासारखी झाडे लावतो व जोपासतो. परंतु, अगदी पोटदुखीपासून ते मधुमेहापर्यंतच्या सर्व समस्यांवर गुणकारी असणारे बेलासारखी झाडे आपणाकडून दुर्लक्षित झाली आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

हे वाचा- पूर्वीची दर्पपुडीका, आताची दापोडी जपतेय शिवकालीनपूर्व मंदिर; वाचा हा इतिहास...

संपूर्ण पिंपरी-चिंचवड व पुणे शहराचा विचार केला, तरी मुख्य रस्त्यांवर दीर्घायुषी झाडांचे रोपण केले आहे. परंतु, ही झाडे गल्ली बोळांमध्ये अडचणीची ठरू शकतात. मग अशा वेळी मध्यम आकाराचे व लवकर वाढणारी बेलाची झाडे ही आपल्याला सर्व बाजूंनी उपयोगी ठरू शकतात. आयुर्वेदात बेलाच्या झाडाचे अत्यंत उपयुक्त वर्णन केले आहे. बेल हे देवांचे फळ मानले जाते. त्यामुळेच भगवान शंकराच्या मंदिराभोवती ही झाडे आढळतात. छोटा बेल हा जंगली असतो, तर मोठ्या बेलाचे झाड कोठेही उगवते. दोन्ही झाडांचे गुण सारखेच असतात. मात्र, औषधी वापरासाठी जंगली बेल उपयुक्त आहे, असे सांगितले जाते. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बेलफळ हे छोट्या नारळाप्रमाणे असते. कीड, रोगराई यापासून बचाव करण्यासाठी बेलाच्या झाडावर कसलेही औषध फवारावे लागत नाही. या झाडाचे आयुष्य मोठे असते. बेलफळ नियमित खाल्याने आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे होतात. त्यात मेंदूचे विकार दूर करण्यापासून ते स्मरणशक्ती सुधारण्यास त्याची मदत होते. तसचे पोट साफ रहाणे, पचनशक्ती सुधारण्याबरोबर मुळव्याधीसाठीही बेल उपयुक्त ठरतो. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सेवानिवृत्त वनाधिकारी रमेश जाधव म्हणाले, "पचनक्रिया बिघडल्यास तोंडाचा वास वा मुखदुर्गंधी, अपचनापासून ते पोटदुखी, बद्धकोष्ठता, उन्हाळ्यात डोळे, हातापायांची जळजळ वा रक्ताची कमी असल्यास बेलाचे फळ खूपच गुणकारी आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी साखर कमी करण्यासाठी उपयोगी पडते. विशेष म्हणजे बेलाचे झाड सर्व प्रकारच्या जमिनित लागते व वाढते. बेल हा एकमेव वृक्ष आहे, की ज्यात अनेक धर्म ग्रंथात त्याचा उल्लेख व संस्कृत भाषेत औषधी उपयोग लिहली आहेत."


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: medicinal properties of bella tree