Pimpri : ‘माझी स्मार्ट मेट्रो’अंतर्गत मेट्रो सफर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pimpri

‘माझी स्मार्ट मेट्रो’अंतर्गत मेट्रो सफर

पिंपरी : माझी स्मार्ट मेट्रो या उपक्रमाअंतर्गत वीस नोव्हेंबरला शनिवारी अल्फा लावल, कासारवाडी येथील मेट्रो स्टेशनवर वंचित घटकातील व शालेय दोनशे विद्यार्थी व १५० नागरिकांनी मेट्रो स्टेशन आणि प्रत्यक्ष मेट्रो गाडीचा अनुभव घेतला.

पुणे मेट्रो व पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड यांच्या सौजन्याने आयोजित या कार्यक्रमामध्ये फुगेवाडी येथील महापालिकेची शाळा, रहाटणी येथील एसएनबीपी शाळा, रावेत येथील मस्ती की पाठशाळा, चिंचवड येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम मधील विद्यार्थी सहभागी झाले. पीसीएमसी स्मार्ट सारथी ॲपवर नोंदणी करणाऱ्या १५० नागरीकांना भेटीची संधी देण्यात आली. पुढील उपक्रमासाठी ॲपवर नोंदणी लवकरच सुरू केली जाणार आहे.

या उपक्रमात मुख्यत्वे वंचित घटकातील मुले ज्यांना आपल्या शहरातील संस्था शिक्षण देत आहेत ते सहभागी झाले होते. मेट्रो सेवा प्रत्यक्ष सुरू होण्यापूर्वी ती अनुभवण्याची संधी मुलांना मिळाली. याचे मुलांना अप्रूप वाटले. पीसीएमसी स्मार्ट सारथी हे शहराचे अधिकृत ॲप या मुलांना माहित होते व त्याविषयी त्यांनी छान माहिती दिली.

मेट्रोचे अधिकारी म्हणाले, ‘‘मेट्रो ही आपली आहे आणि समाजातील सर्व घटकांसाठी आहे. हा महत्वाचा विचार सर्वांमध्ये रुजला गेला पाहिजे. सामजिक समरसतेचे हे उत्तम उदाहरण आहे.’’

loading image
go to top