Pune Metro work Issue
sakal
- अविनाश ढगे
पिंपरी - जिने-सिलिंगचे काम अपूर्ण, मार्बल बसवलेेले नाही; तर कुठे लिफ्ट बंदच आहे. सरकते जिने बसवले असून, वीजपुरवठा नाही. फॅब्रिकेशनसह अन्य कामे अर्धवट आहेत. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेच्या बाणेरपर्यंतच्या सहा स्थानकांची ही स्थिती ‘सकाळ’ने बुधवारी केलेल्या पाहणीत आढळली. असे असताना ‘मेट्रो सुरू होणार’, अशा वल्गना प्रशासनाकडून सुरू आहेत. त्यामुळे मेट्राेसह स्थानकेही यार्डातच असल्याचे दिसून आले.