
PCMC Water Cut
Sakal
पिंपरी : मेट्रो मार्गाचे खांब उभारणीसाठी खोदकाम सुरू असताना महापालिकेची मुख्य जलवाहिनी फुटली. तिच्या दुरुस्तीचे काम शुक्रवार (ता. २६) सकाळपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. जलवाहिनी फुटल्याचा फटका चिखली, मोशी, तळवडे, नेहरूनगर, संत तुकारामनगर आदी भागाला बसला. येथील पाणीपुरवठा बंद ठेवला असून नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.