कामगारांविना मेट्रोचे काम धीम्या गतीने

स्वारगेट ते पिंपरी चिंचवड मेट्रोचे काम २०१८ ला सुरू झाले. परंतु, पुढील दीड वर्षांच्या कालावधीत कोरोनामुळे कुशल कामगारांनी घरची वाट धरली.
Metro Station
Metro StationSakal

पिंपरी - स्वारगेट ते निगडी या उन्नत मेट्रो (Metro) मार्गिकेवर असलेल्या पिंपरीतील संत तुकारामनगर मेट्रो स्टेशनचे काम (Work) ९५ टक्के पूर्ण झाले आहे. सुमारे १४० मीटर फ्लॅटफॉर्मचे (Platform) काम अंतिम टप्प्यात आहे. परंतु, पिंपरी-चिंचवड शहरातील (Pimpri Chinchwad City) बहुचर्चित पुणे महामेट्रोला आता परप्रांतीय कुशल कामगारांची उणीव भासत आहे. कारण, कोरोना आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर हे कामगार गावी गेले आहेत. (Metro work slows down without workers)

स्वारगेट ते पिंपरी चिंचवड मेट्रोचे काम २०१८ ला सुरू झाले. परंतु, पुढील दीड वर्षांच्या कालावधीत कोरोनामुळे कुशल कामगारांनी घरची वाट धरली. त्याचा परिणाम मेट्रोच्या कामावर झाला असून, सध्या फिटर, पेंटर, वेल्डर, मेसन, फॅब्रिकेटर या कुशल कामगारांचा तुटवडा जाणवत आहे. पहिल्या लॉकडाउनपूर्वी हे मनुष्यबळ ३५०च्या आसपास होते. सध्या अवघे १५ कामगार उरले आहेत. त्यामुळे काही प्रमाणात मेट्रोची गती मंदावण्यास कामगार वर्ग कारणीभूत ठरत आहे. सध्या चौपट संख्येने कामगारांची गरज महामेट्रोला आहे.

Metro Station
बांधकाम कामगार सेनेच्या संस्थापक अध्यक्षांचे निधन

पिंपरीपर्यंतच असलेल्या मेट्रो मार्गिकेला निगडीपर्यंत राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. स्वारगेट ते निगडी या उन्नत मेट्रो मार्गिकेवर आधी दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, भोसरी, संत तुकारामनगर, पिंपरी-चिंचवड महापालिका भवन या सहा स्थानकांसह चिंचवड, आकुर्डी व निगडी या तीन स्थानकांचा नव्याने समावेश झाला. एकूण नऊ स्थानके झाली. नव्याने झालेल्या मार्गिकेची लांबी ४.४१ किलोमीटर इतकी आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन या विशेष वहन हेतू (एसपीव्ही) मार्फत करण्यात येत आहे.

केंद्र सरकारचा एकूण खर्चाच्या १० टक्के सहभाग असून, कर्जाच्या स्वरूपात निधी उभारण्यात येणार आहे. राज्य सरकारचा एकूण ७९ कोटी ४ लाख तसेच, ९० कोटी ६३ लाख रुपये परतफेड करावयाचे दुय्यम कर्ज, असे एकूण १७० कोटी तीन लाख असा सहभाग आहे. निगडी ते स्वारगेट मार्गिकेसाठी २०२३ मध्ये ४.९५ लाख प्रवाशांची दैनंदिन वाहतूक होईल, असा अंदाज बांधण्यात आला आहे. या मार्गावर एकूण चार किलोमीटर दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दोन वेळा ट्रायल रन घेतली होती. ती यशस्वीपणे पार पडली.

Metro Station
पिंपरी-चिंचवडमध्ये ७१६ नवीन रुग्ण; आठ रुग्णांचा मृत्यू

आकर्षण

  • १० - स्टेशन पिलर

  • २ - सरकते जिने

  • वारकरी व नारीशक्ती या थीम

  • रुफ

  • डिजिटल साइन बोर्ड

  • तिकीट काउंटर

सुविधा

  • १ प्रत्येकी - स्वच्छतागृह : महिला, पुरुष, अपंग

  • ५२ - सीसीटीव्ही

  • ४ - सिग्नल

  • २ फायर सिस्टीम

  • लिफ्ट दोन : प्रत्येकी १४ माणसे क्षमता

  • ६ - जिने

  • १ - अतिरिक्त भाडे कार्यालय

सध्या ५० टक्केच कुशल कामगार आहेत. लॉकडाउनच्या धास्तीने बरेच जण निघून गेले आहेत. काही कामगार पुन्हा आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लॉकडाउन संपल्यानंतर ते येतील. परंतु, आरटीपीसीआर चाचणी गरजेची असल्याने अडचण येत आहे. सध्या मेट्रोचे ५२ टक्के काम पूर्ण झाले आहे.

- हेमंत सोनावणे, महाव्यवस्थापक, महामेट्रो

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com