बांधकाम कामगार सेनेच्या संस्थापक अध्यक्षांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांधकाम कामगार सेनेच्या संस्थापक अध्यक्षांचे निधन

बांधकाम कामगार सेनेच्या संस्थापक अध्यक्षांचे निधन

पिंपरी - बांधकाम कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष जयंत मारुती शिंदे (वय ६२) (jayant shinde) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी रात्री निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. मंगळवारी मध्यरात्री शिंदे यांना अर्धांगवायूचा झटका आला. उपचारासाठी आकुर्डी (Akurdi) येथील स्टर्लिंग हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यांची प्रकृती गंभीर होत गेली आणि दुपारी चारच्या सुमारास त्यांची प्राण्यज्योत मालवली. शिंदे हे मूळचे अकोला (Akola) तालुक्यातील ब्राह्मणवाडा या गावचे होते. (construction workers sena leader jayant passes away)

हेही वाचा: मृताच्या टाळूवरचे ‘ते’ खाताहेत लोणी

शिवसेना प्रणित भारतीय कामगार सेनेच्या अखत्यारीत दहा २०१० मध्ये बांधकाम कामगारांसाठी स्वतंत्र संघटना स्थापन कऱण्यात आली. पिंपरी चिंचवड शहरात या संघटनेचे रोपटे शिंदे यांनी लावले. आज सुमारे १५ हजारावर बांधकाम कामगार या संघटनेचे सदस्य आहेत. तत्पूर्वी या कामगारनगरीत बांधकाम कामगार दुर्लक्षित होते. जयंत शिंदे यांनी संघटनेच्या माध्यमातून हजारो कामगारांना शासकीय योजनांचे आर्थिक लाभ मिळवून दिले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Maharashtra News
loading image
go to top