Video : होते नव्हते सगळे पैसे संपले; उपासमारी वाढली अन् 'हे' पाऊल उचलले...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 15 May 2020

घरात अन्नाचा कण नाही. जवळचे पैसेही संपले. म्हणून गावाकडच्या कुटुंबीयांकडून थोडेफार पैसे मागविले. तेही संपले. त्यामुळे होणाऱ्या उपासमारीला वैतागून आम्ही गावाकडचा रस्ता धरला आहे.

पिंपरी : घरात अन्नाचा कण नाही. जवळचे पैसेही संपले. म्हणून गावाकडच्या कुटुंबीयांकडून थोडेफार पैसे मागविले. तेही संपले. त्यामुळे होणाऱ्या उपासमारीला वैतागून आम्ही गावाकडचा रस्ता धरला आहे. थेरगाव येथील एका बांधकाम साईटवर सेंट्रिंगचे काम करणारा बिहारचा पप्पू यादव सांगत होता. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पप्पू यादवसह या साईटवर जवळपास 23 जण काम करतात. यापैकी काहीजण बिहारचे, तर काही पश्‍चिम बंगालमधून रोजगारासाठी शहरात वास्तव्यास आलेले आहेत. सहा महिन्यांपासून ते शहरात राहत होते. पप्पू म्हणाला, "आम्हाला ठेकेदाराने पगारही पूर्ण दिला नाही. एकदा 200 रुपये आणि त्यानंतर 500 रुपये दिले. मात्र, त्यानंतर काहीच दिले नाही. त्यामुळे जेवणाची भ्रांत निर्माण झाली.'' त्यामुळे हे सर्वजण गावी निघाले. घरातील सिलिंडरची शेगडी, बादल्या, पांघरूण असे सर्वच संसारोपयोगी साहित्य त्यांच्याकडे होते. काहींच्या दोन्ही हातात पिशव्या आणि डोक्‍यावरही वस्तू होत्या. 

Video : स्वत:चे प्राण गमावून वाचविला मालकाचा जीव; कशी घडली ही दुर्दैवी घटना...वाचा

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

बिहारला रेल्वेने जाण्यासाठी आवश्‍यक त्या परवानग्या घेण्यासाठी त्यांनी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात अर्जही दिला. त्याचा पाठपुरावाही केला. मात्र, पदरी निराशाच पडली. पप्पू यादव याच्याशी बोलत असतानाच त्यांचा ठेकेदार अजय सिंग तेथे आला. तो कामगारांना गावाला जाऊ नका. दहा दिवस थांबा. रेल्वेची व्यवस्था झाली की जा, असे सांगत होता. पण कोणीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यामुळे अखेर सर्वांनीच पुढचा रस्ता पकडला बिहार आणि पश्‍चिम बंगालच्या दिशेने. ठेकेदार अजय सिंग याने मात्र मी कामगारांना पूर्ण पगार दिला. तसेच गावाला जाण्यासाठी प्रत्येकाला पाच ते सात हजार रुपये दिल्याचा दावा केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: migrants people's are going towards bihar and west bengal