पिंपरीतील फुलबाजाराचे 'या' ठिकाणी झाले स्थलांतर 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 ऑगस्ट 2020

पिंपरीतील फुलबाजाराचे स्थलांतर करावे, अशी मागणी कित्येक दिवसांपासून व्यापाऱ्यांनी केली होती.

पिंपरी : पिंपरीतील फुलबाजाराचे स्थलांतर करावे, अशी मागणी कित्येक दिवसांपासून व्यापाऱ्यांनी केली होती. प्रतीक्षेत असलेल्या पिंपरी शगुन चौक येथील फुलबाजाराचे शनिवारी (ता. 1) पिंपरीतील कत्तलखान्याजवळील रिकाम्या जागेत अखेर स्थलांतर झाले. त्यामुळे कायम गजबजलेल्या शगुन चौकाने वाहतूक कोंडीतून मोकळा श्वास घेतला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

शगुन चौकातील रस्त्यावरच हा फुलबाजार भरत असल्यामुळे नेहमीच वाहतूक कोंडीचा सामाना सर्वांना करावा लागत होता. अखेर महापालिकेने 25 ते 30 फुलबाजार व्यापाऱ्यांना भाडे तत्त्वावर जागा दिली. नोव्हेंबरमध्ये माजी महापौर राहूल जाधव यांच्या हस्ते या फुलबाजाराचे उद्घाटन करण्यात आले होते. हा फुलबाजार सुरू व्हावा, यासाठी तत्कालीन पिंपरी उपबाजार प्रमुख एन. डी. घुमले, राजू शिंदे, मोशी उपबाजार प्रमुख निलेश लोखंडे, सचिव खंडागळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फुलबाजार शासकीय नियम पाळून सकाळी 6 ते 10 या वेळेत सुरू राहणार आहे. फुलबाजार सुरू झाल्यामुळे व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. पहिल्याच दिवशी या फुलबाजाराला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Migration of flower market in Pimpri