मॅट्रीमोनियल साईटवरून २५५ तरूणींची कोट्यवधींची फसवणूक; दोघे अटकेत

केंद्र सरकारमध्ये उच्च पदावर कार्यरत असल्याचे भासवून मॅट्रीमोनियल साईटवरून बनावट नावाने तरूणींना लग्नाचे आमिष दाखवायचे. त्यानंतर तरुणींकडून पैसे उकळणाऱ्या दोघांना वाकड पोलिसांनी बेंगलोर येथून अटक केली.
Crime Arrested
Crime ArrestedCrime
Summary

केंद्र सरकारमध्ये उच्च पदावर कार्यरत असल्याचे भासवून मॅट्रीमोनियल साईटवरून बनावट नावाने तरूणींना लग्नाचे आमिष दाखवायचे. त्यानंतर तरुणींकडून पैसे उकळणाऱ्या दोघांना वाकड पोलिसांनी बेंगलोर येथून अटक केली.

पिंपरी - केंद्र सरकारमध्ये उच्च पदावर कार्यरत असल्याचे भासवून मॅट्रीमोनियल साईटवरून (Matrimonial Sites) बनावट नावाने तरूणींना (Girl) लग्नाचे (Marriage) आमिष दाखवायचे. त्यानंतर तरुणींकडून पैसे (Money) उकळणाऱ्या दोघांना वाकड पोलिसांनी (Police) बेंगलोर येथून अटक (Arrested) केली. या दोघांनी मॅट्रीमोनियल साईटवरून पुणे, बेंगलोर व गुरगाव येथील तब्बल २५५ तरूणींशी संपर्क साधून फसवणूक (Cheating) केल्याचे व काही तरुणींचे शारीरिक शोषण केल्याचे समोर आले असल्याची माहिती पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत दिली.

निशांत रमेशचंद नंदवाना (वय ३३) व विशाल हर्षद शर्मा (वय ३३, दोघे रा. मुळ - राजस्थान, सध्या - बेंगलोर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. निशांत हा केंद्र सरकारच्या पब्लिक वर्क डिपार्टमेंटमध्ये चीफ प्रोजेक्ट मॅनेजर असल्याची तर, विशाल हा केंद्र सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ सेंट्रल हौसिंग अँड अर्बन अ‍ॅग्रिकल्चर मिनिस्ट्रीचा डेप्युटी डायरेक्टर असल्याचे खोटे सांगायचा. दोघांनी वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन तरूणींसमवेत जीवनसाथी या मॅट्रीमोनियल साईटवरून ओळख निर्माण केली. निशांतने आपले नाव अधितांश अग्निहोत्री तर विशालने अश्विक शुक्ला हे बनावट नाव वापरले. आलिशान मोटारीतून येऊन तरूणींना फिरायला नेऊन लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर एकाने तरूणीकडून एका प्रोजेक्टसाठी १३ लाख रूपये घेतले. तर, दुसऱ्याने व्यवसायासाठी तरूणीकडून पाच लाख रूपये घेतले. तसेच जीपमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर दोघेही मोबाईल बंद करून पुण्यातून पसार झाले. आपली फसवणूक झाल्याचे दोन्ही तरूणींच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

Crime Arrested
देवपूजा करताना सासूवर झाडली सुनेने गोळी

आरोपींनी इतरही तरूणींना फसविले असण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी तपास सुरू केला. दोघे आरोपी बेंगलोर येथे उच्चभ्रू वसाहतीत बनावट नावाने राहत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. एकाच फ्लॅटमध्ये राहणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तेरा महागडे मोबाईल, बनावट नावाची ओळखपत्रे, दोन मोटारी, रोकड असा ७५ लाखांचा ऐवज जप्त केला. त्यांच्यावर गुरगाव येथे दोन, बेंगलोर येथे तीन तर पुण्यात एक गुन्हा दाखल आहे. या आरोपीना अटक करून न्यायालयात हजर केले असता २८ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई वाकडचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, निरीक्षक (गुन्हे ) संतोष पाटील, रामचंद्र घाडगे, सहायक निरीक्षक संतोष पाटील, अभिजीत जाधव, बालाजी ठाकूर यांच्या पथकाने केली.

सव्वा ते दीड कोटी रूपये उकळल्याची शक्यता

तपासात दोन्ही आरोपींनी पुण्यातील ९१, बेंगलोर येथील १४२ तर गुरगाव येथील २२ अशा तब्बल २५५ तरूणींशी मॅट्रीमोनियल साईटवरून संपर्क साधल्याचे समोर आले आहे. त्यांनी आणखी किती तरूणींची फसवणूक केली याचा तपास पोलिस करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत या माध्यमातून सव्वा ते दीड कोटी रूपये उकळल्याची शक्यता आहे.

ही वापरली बनावट नावे

आरोपी निशांत याने पुण्यात अधितांश अग्निहोत्री, बंगलोरमध्ये अभव कश्यप तर गुरगाव येथे आधव अग्निहोत्री ही बनावट नावे वापरली. तर विशाल शर्मा याने पुण्यात अश्विक शुक्ला, बंगलोरमध्ये अथर्वन तिवारी व गुरगाव येथे अव्याग्र्ह शुक्ला, रुद्रांश शर्मा, देवांश शर्मा, अचैत्य शर्मा ही बनावट नावे वापरून मोबाईल क्रमांकही वेगवेगळे वापरले.

येथे साधा संपर्क

या आरोपींनी देशभरात अनेक मुलींचे शोषण करून लाखो रुपयांना गंडा घातला आहे. अशाप्रकारे बळी पडलेल्या मुलींनी तात्काळ ९४२२००८८०४, ९८२३८६६५०२ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com