esakal | पिंपरी-चिंचवडकरांनो पीठ गिरणीचालक जादा पैसे घेत असतील, तर ही बातमी वाचाच
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवडकरांनो पीठ गिरणीचालक जादा पैसे घेत असतील, तर ही बातमी वाचाच

पिंपरी-चिंचवड मालक पीठ गिरणी महासंघाच्या नावाखाली काही पीठ गिरणी चालक व मालकांकडून नवे दरपत्रक वितरित करण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवडकरांनो पीठ गिरणीचालक जादा पैसे घेत असतील, तर ही बातमी वाचाच

sakal_logo
By
आशा साळवी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड मालक पीठ गिरणी महासंघाच्या नावाखाली काही पीठ गिरणी चालक व मालकांकडून नवे दरपत्रक वितरित करण्यात येत आहे. नव्या दरानुसार दळून घेऊ नये, कोणी जादा पैसे मागत असल्यास ग्राहकांनी त्यांच्याविषयी महासंघाकडे तक्रार करावी. असे आवाहन महासंघाचे अध्यक्ष सुरेश लिंगायत आणि उपाध्यक्ष गुलाब वाल्हेकर यांनी केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवड शहरात महासंघाकडे 4 हजार गिरणी मालकांची नोंदणी आहे. मात्र अनेकदा मालक बैठकीला उपस्थित नसतात. सभासद नोंदणी शुल्क देत नाहीत. पदाधिकाऱ्यांनी मागितल्यास 'मालक पैसे देत नाही, मी नवीन नोकर आहे, मालकांना वेळ नाही, मालक नाहीत,' असे उडवाउडवी उत्तरे दिली जाताहेत. अनेक मालकांच्या एकापेक्षा अधिक गिरण्या आहेत. दरवाढीविषयी माहिती नसते. त्यामुळे बराचवेळा गोंधळ उडतो. त्यातच आता शहरात नवनवीन पीठगिरणी असोसिएशन किंवा गिरणी युनियन नावाने काहींनी काम सुरू केले आहे. त्यामुळे ग्राहकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अध्यक्ष लिंगायत यांनी केला आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या पाच रुपये प्रतिकिलो दळणाचे दर आहेत. महासंघाच्या नावाचा गैरवापर करून काही गरीब मंडळी दरवाढीला साथ देत आहेत. त्या दरपत्रकाची छायांकित प्रतीवर महासंघाच्या अध्यक्षांचे नाव खोडून स्वत:चे नाव कोरले आहे. काहींनी आपापल्या परिसरापुरते एक रुपया, दोन रुपये वाढवले आहे. अशा दरपत्रकापासून ग्राहकांनी सावध व्हावे, असे आवाहन महासंघाने केले आहे. सध्या जुनेच दर वापरात आहेत. दसऱ्यानंतरच नवीन दरवाढ करण्यात येईल, प्रत्येक पिठगिरणीत वजनकाटा ठेवणे बंधनकारक आहे. ग्राहकांनी वजनकाटा असलेल्या गिरणीतूनच सेवा घ्यावी, असे उपाध्यक्ष वाल्हेकर यांनी म्हटले आहे. 

सध्याचे दर 

  • गहू - 5 रुपये 
  • ज्वारी - 5 रुपये 
  • बाजरी - 5 रुपये 
  • मका - 8 रुपये 
  • तांदूळ - 8 रुपये
loading image