
गुरुवारी (ता. ४) सायंकाळी साडे सात वाजता सुरज जैस्वाल याने पूर्वी झालेली भांडणे मिटविण्यासाठी आकाश खरात याला नेहरूनगर येथील हॉकी स्टेडियमजवळ बोलविले होते.
पिंपरी : आठ जणांच्या टोळक्याने कोयता, चॉपरने तरुणावर प्राणघातक हल्ला केला. तरुणाच्या मित्रांवरही वार केले. त्यानंतर पिस्तूल सारख्या हत्याराचा फाटफाट आवाज करीत कोयते, हत्यारे हवेत भिरकावून टोळक्याने परिसरात दहशत माजविल्याची घटना नेहरूनगर येथे घडली.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
किरण जैस्वाल, सुरज जैस्वाल, रोहित भालेराव, रॉबिन सिंग, रोहित कसबे (सर्व रा. नेहरूनगर, पिंपरी), अरविंद शेलार, अदनान, डायमंड सर्व रा. ओटा स्कीम, निगडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी अक्षय अण्णा रणदिवे (रा. सेक्टर नंबर १०, भोसरी एमआयडीसी) यांनी फिर्याद दिली आहे. गुरुवारी (ता. ४) सायंकाळी साडे सात वाजता सुरज जैस्वाल याने पूर्वी झालेली भांडणे मिटविण्यासाठी आकाश खरात याला नेहरूनगर येथील हॉकी स्टेडियमजवळ बोलविले होते. त्यावेळी आकाश खरात व त्याच्यासोबत फिर्यादी, सागर प्रधान, घनश्याम यादव, सुशांत जाधव हे तेथे गेले होते. दरम्यान, आरोपीनी पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून आकाश याच्यावर कोयते, चॉपरने वार करीत पिस्तूल सारख्या हत्याराने जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तर यादव, प्रधान व जाधव यांच्यावरही चॉपर व कोयत्याने वार केले.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दरम्यान, दहशत माजविण्याच्या उद्देशाने पिस्तूल सारख्या हत्याराचा फाटफाट आवाज करीत कोयते, हत्यारे हवेत भिरकावून पसार झाले. या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.