गर्दीच गर्दी चोहिकडे

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 21 February 2021

पिंपरी शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, नागरिकांचा निष्काळजीपणा दृष्टीस पडत आहे. भाजी मंडई, किराणा दुकान, मॉल, हॉटेल-रेस्टॉरंट, मंगल कार्यालये, खाऊ गल्ल्या, बिअरबार, पीएमपी स्थानके ही गर्दीने गजबजलेली दिसत आहेत. सोशल डिस्टंन्सिंगचे व मास्क न लावता नागरिक वावरत आहेत.

पिंपरी - शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, नागरिकांचा निष्काळजीपणा दृष्टीस पडत आहे. भाजी मंडई, किराणा दुकान, मॉल, हॉटेल-रेस्टॉरंट, मंगल कार्यालये, खाऊ गल्ल्या, बिअरबार, पीएमपी स्थानके ही गर्दीने गजबजलेली दिसत आहेत. सोशल डिस्टंन्सिंगचे व मास्क न लावता नागरिक वावरत आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरात बऱ्याच ठिकाणी गर्दीचे स्पॉट ठरलेले आहे. होलसेल दरात वस्तू किंवा इतर साहित्य मिळणाऱ्या ठिकाणी गर्दीचा ओढा जास्त आहे. उद्याने सुरू झाली आहेत. मात्र, नागरिक सोशल डिस्टन्स राखताना दिसत नाहीत. ज्येष्ठ नागरिक जिवाची पर्वा न करता बिनधास्तपणे उद्यानात भटकत आहेत. बऱ्याच जणांनी वाढदिवस, बारसे, मुंजीचे कार्यक्रम देखील थाटामाटात साजरे करणे सुरू केले आहे. त्याचबरोबर नियमांचे उल्लंघन करून पन्नासच्यावर माणसे जमविली जात आहेत. बऱ्याच जणांनी लग्नानंतरच्या पूजेचा सोहळा देखील थाटामाटात केला आहे. 

मोशीत तरुणाचा खून; ओळख लपविण्यासाठी मृतदेह जाळला

नागरिक नियमांचे काटेकोर पालन करत नसल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती सतावत आहे. पुन्हा पहिल्या लॉकडाउनच्या सुरुवातीचे दिवस पूर्ववत होण्याची चिंता नागरिकांना घोंघावू लागली आहे., तर दुसरीकडे पोटमारा होणार नाही ना ही देखील भीती नागरीकांना आहे. मास्क न घालता फिरणे, रस्त्यावर  थुंकणे, पिचकाऱ्या मारणे याबाबत नागरीकांना जराही संकोच राहिला नाही. सर्रासपणे बिनदिक्कत वावरत आहेत. महापालिका व पोलिस प्रशासन कारवाई कडकपणे राबवताना नागरिक अरेरावीची भाषा करत आहेत. नियमांचा भंग करून प्रशासनाला दंडाबाबत हुज्जत घालताना चौकाचौकात काही युवक दिसत आहेत. 

Video : मोठी कारवाई : सांगवी पोलिस स्टेशन झालं गॅस सिलिंडर गोडाऊन; 22 जण ताब्यात

फेब्रुवारीमधील कारवाई

  • मास्क नसलेल्यांवर झालेली कारवाई : ६९५
  • मास्क नसलेल्याकडून आकारलेला दंड : ३,५५,५००
  • थुंकलेल्यांवर झालेली कारवाई : ५२६६
  • थुंकलेल्यांकडून वसूल झालेला दंड :८२१२००

आमच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे. गर्दीच्या ठिकाणीच व्यवसाय होतो. ज्या ठिकाणी नागरिक येत नाहीत, अशा ठिकाणी आमचा धंदा कसा होणार? व्यवसाय संकटात आहे. रोज रस्त्यावर उभा राहूनच व्यवसाय करावा लागतो. तेव्हा पोटाचा प्रश्न मिटतो.   
- भाजी विक्रेता 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mob in Pimpri Camp Corona