सावधान, मुलांच्या डोळ्यांवर सीव्हीएसचे आक्रमण; पालकांची चता वाढली 

अवधूत कुलकर्णी 
शनिवार, 30 मे 2020

सध्या मुलांच्या हाती दिवसभर मोबाईल असतो किंवा कॉम्प्युटर तरी असतो.याचा विपरीत परिणाम डोळ्यांवर होऊन कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम होण्याची भीती वाढली आही.त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

पिंपरी -  लॉकडाउनमुळे परीक्षा रद्द झाल्या किंवा पुढे तरी ढकलल्या. मग मुलांना काय, घरी बसून मोबाईल हाच विरंगुळा झाला. दुसरीकडे काही शाळांनी, खासगी क्लासेसनी ऑनलाइन शिक्षणाचा फंडा वापरण्यास सुरुवात केली. त्यामुळे सध्या या मुलांच्या हाती दिवसभर मोबाईल असतो किंवा कॉम्प्युटर तरी असतो. याचा विपरीत परिणाम त्यांच्या डोळ्यांवर होऊन कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम होण्याची भीती वाढली आही. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सध्या अनेक व्यवहार ऑनलाइन होत आहेत. शिक्षणक्षेत्रही त्याला अपवाद नाही. मुलांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देताना काही समस्या दिसून येत आहेत. प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या मुलांचे डोळे नाजूक असतात. कॉम्प्युटर किंवा मोबाईलवर सतत काम केल्याने डोळ्यांवर अतिरिक्त ताण येतो. त्याला वैद्यकीय परिभाषेत कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम (सीव्हएस) असे संबोधले जाते. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सीव्हीएसची लक्षणे 
- डोळे लालसर होणे 
- वाचायला अवघड होणे 
- डोळ्यातून पाणी येणे 
- चरचर, जळजळ होणे 

उपाय 
मोबाईल, संगणकावर सतत शिक्षण घेतल्यास डोळ्यांची आतील बाजू कोरडी पडू शकते. त्यासाठी पाणी जास्त प्यावे. डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार डोळ्यात ल्युब्रिकंट ड्रॉप घालावेत. अनेकांना अंधार करून मोबाईल, टीव्ही बघण्याची सवय असते. ती चुकीची असल्याचे नेत्ररोगतज्ज्ञांनी म्हणणे आहे. डोळ्यांनी नीट दिसत नसेल तर तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. डोळ्यांना चष्मा लागला आहे का, चष्मा असल्यास शिक्षण सुरू करण्यापूर्वी त्याचा क्रमांक तपासून घ्यावा. 

हेही करा 
- मुलाला नीट दिसत नसेल तर नेत्ररोगतज्ज्ञाकडे न्यावे 
- अभ्यासासाठीच्या खोलीत पुरेसा उजेड असावा 
- मोबाईल, संगणक, टॅबलेट यांचा स्क्रीन जास्त उजेडाचा (ब्राइटनेस) नसावा 

मुलांना शिक्षण देताना २०-२०-२० चा फॉर्म्युला उपयुक्त ठरतो. त्यानुसार ऑनलाइन शिक्षण घेताना ते सलग २० मिनिटे घ्यावे. त्यानंतर २० सेकंद डोळ्यांना विश्रांती द्यावी आणि डोळ्यापासून स्क्रिनचे (मोबाईल, संगणक, टॅबलेट इ.) अंतर २० इंच असावे. या बाबींचे पालन केल्यास डोळ्यांच्या समस्या फारशा उद्‌भवणार नाहीत. 
- डॉ. आदित्य केळकर, संचालक, एनआयओ, पुणे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mobiles & computers affect children's eyes & increase fear of CVS