निगडीतील गुन्हेगार 'चंडालिया' टोळीवर मोका 

Moka case filed against Chandalia gang pimpri chinchwad police
Moka case filed against Chandalia gang pimpri chinchwad police

पिंपरी : निगडीतील गुन्हेगार टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत (मोका) कारवाई करण्यात आली. टोळी प्रमुख रोहन राजू चंदेलिया उर्फ चंडालिया (वय 20, रा. जाधववस्ती, रावेत), विजय उर्फ गुंड्या निळकंठ शिंदे (वय 28, रा. ओटास्कीम, निगडी), प्रदीप महादेव जगदाळे (वय 19, रा. ओटास्कीम, निगडी), विशाल विक्रम सोळसे (वय 19, रा. ओटास्कीम, निगडी), निलेश उर्फ निलू देविदास कांबळे (वय 22, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), यश उर्फ रघु अतुल कदम (वय 19, रा. ओटास्कीम, निगडी), किरण शिवाजी खवळे (वय 20, रा. ओटास्कीम, निगडी), नंदकिशोर उर्फ मनोज उर्फ मन्या शेषराव हाडे (वय 25, रा.गणेशनगर,चिखली) यासह दोन अल्पवयीन मुले अशी मोकाची कारवाई केलेल्या आरोपींची नावे आहेत. 

या आरोपींवर दरोडा, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दुखापत, घरफोडी, बलात्कार, अपहरण करणे, जबरी चोरी करून दुखापत करणे, दरोड्याची तयारी करणे, सार्वजनिक ठिकाणी लोकांमध्ये दहशत माजवणे, वाहनांची तोडफोड करणे, बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणे, बेकायदेशीररित्या घातक शस्त्रे जवळ बाळगणे असे एकूण 30 गुन्हे पिंपरी-चिंचवड शहर, पुणे शहर येथे दाखल आहेत.

ही टोळी वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी टोळी बनवून संघटितपणे गुन्हे करत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे या टोळीवर मोका कारवाई करण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com