Anant Chaturdashi 2020 : चिंचवड परिसरात सात हजारांहून अधिक भाविकांनी केले मूर्तीदान

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 September 2020

'गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या'चा गजर करीत शहरवासीयांनी मंगळवारी अनंत चतुर्दशीनिमित्त लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला.

चिंचवड : 'गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या'चा गजर करीत शहरवासीयांनी मंगळवारी अनंत चतुर्दशीनिमित्त लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. दिवसभरात चिंचवड परिसरातील सात हजारांहून अधिक भाविकांनी मूर्तीदान केल्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेले दहा दिवस घरोघरी बसलेल्या गणपतीची भाविकांनी मनोभावे सेवा केली. लाडक्या गणरायाच्या आवडीच्या विविध खाद्य पदार्थांचा गणरायाला नैवेद्य दाखविण्यात होता. यंदा कोरोनामुळे सार्वजनिक गणेश मंडळांनी देखावे सादर केले नाहीत. तसेच अनेक मंडळांनी मंडपही उभारले नव्हते. काही जणांनी सकाळीच विसर्जन केले. महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील केशवनगर, धनेश्वर मंदिर घाट, लक्ष्मीनगर, थेरगाव येथील घाट, अशा चार ठिकाणी मूर्तीदानाची व्यवस्था केली होती. त्यापैकी थेरगाव येथील घाटावर भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

ठळक वैशिष्ट्ये

 • महापालिकेच्या वतीने मूर्तीदान ठिकाणी वरचेवर औषध फवारणी
 • भाविकांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याबाबत सूचना
 • मूर्तीदानाच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त
 • नागरिकांकडून शिस्तबद्धरित्या मूर्ती विसर्जन
 • दान केलेल्या मूर्तींचे वाकड येथील खाणीत विधिवत विसर्जन
 • मयुरेश्वर मित्र मंडळातर्फे मूर्तीदान उपक्रम
 • जागोजागी निर्माल्य कुंडांची पुरेशी व्यवस्था

आकडे बोलतात

 • चिंचवड परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळे - 60
 • घरगुती गणेशमूर्तींची संख्या - 5000 ते 6000
 • मूर्तीदानासाठी काम करणारे संस्कार प्रतिष्ठानचे कार्यकर्ते - 30
 • डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सचे विद्यार्थी - 20

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: More than 7,000 devotees donated idols in Chinchwad