Pune News: 'चार घास खाल्ले अन् सर्व काही कोसळलं'; मोशी दुर्घटनेतील जखमी भूषण पाटीलची हृदयद्रावक कहाणी, लहानपणीच पितृछत्र हरपले..

11 Hours Under Debris Bhushan Patil Story: मोशी कचरा डेपो दुर्घटनेत ११ तास स्लॅबखाली अडकलेल्या भूषण पाटीलची थरारक सुटका; लहानपणी वडिलांचे छत्र हरवूनही शिक्षण, नोकरीपर्यंतचा संघर्षमय प्रवास
Moshi Waste to Energy Plant Collapse Survivor Bhushan Patil Shares Heartbreaking Story of Survival and Recovery

Moshi Waste to Energy Plant Collapse Survivor Bhushan Patil Shares Heartbreaking Story of Survival and Recovery

sakal

Updated on

पिंपरी: ‘‘आम्ही जेवायला बसलो होतो. दोन-तीनच खास खाल्ले आणि भूकंपासारखे हादरे बसले. घाबरून कॅंटीनमधून बाहेर पळायला लागलो. पण, काही क्षणात स्लॅब व पीओपी कोसळले. त्याखाली दाबला गेलो. अकरा तास तसाच पडून होतो. वाचवायला आलेल्यांनी पाणी प्यायला दिले. रात्री दोनच्या सुमारास हॉस्पिटलला आणले. आता बरं वाटतंय, उद्या डिस्चार्ज मिळणार आहे.’’ हा घटनाक्रम सांगितला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील जखमी तरुण कामगार भूषण पाटील यांनी.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com