

Nine Workers Killed in Moshi Waste Depot Accident Two Months On Final Inquiry Report and Accountability Still Awaited
sakal
पिंपरी: मोशी कचरा डेपोतील ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळून नऊ कामगारांचा मृत्यू झाला. त्या दुर्घटनेला दोन महिने पूर्ण झाले. दुर्घटनेतील अधिकारी, ठेकेदार कंपनी व इतर संबंधितांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी नेमलेल्या विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय चौकशी समितीची अंतिम अहवाल सादर करण्याची मुदत सोमवारी (ता. १४) संपली. मात्र, अंतिम अहवाल शासनाकडे सादर झाला का आणि त्यात कोणावर ठपका ठेवण्यात आला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती विभागीय आयुक्त शीतल तेली यांनी जाहीर केलेली नाही.