
सावत्र बापाने चार वर्षांचा सावत्र भाऊ आणि आईचा खून केल्याची घटना चिंचवड येथे घडली. आई आणि मुलाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.
पिंपरी - सावत्र बापाने चार वर्षांचा सावत्र भाऊ आणि आईचा खून केल्याची घटना चिंचवड येथे घडली. आई आणि मुलाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.
सुमय्या नासिर शेख (वय 41), आयान नासिर शेख (वय 4) असे खून झालेल्या माय लेकरांची नावे आहेत. नोमान उर्फ सोमेश्वर काळे (वय 40) असे गुन्हा दाखल झालेल्या नराधम बापाचे नाव आहे. याबाबत सुमय्या यांच्या मुलीने चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी हा फिर्यादी महिलेचा सावत्र बाप आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
आरोपी बाप फिर्यादी यांच्या मयत सावत्र भाऊ आयान याला घरातून घेऊन गेला. दरम्यान, आरोपीला काही कारणास्तव घरात राहू दिले नाही. या कारणावरून त्याने फिर्यादी यांची आई सुमय्या आणि भाऊ आयान यांच्यावर हत्याराने वार करून निर्घृणपणे खून केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
तुंगार्ली धरण परिसरात ट्रकभर बाटल्या गोळा ; नगरपरिषदेने राबवली स्वच्छता मोहीम
शनिवारी वाल्हेकरवाडी येथील मोरया कॉलनीमध्ये एका बंद खोलीतून उग्र वास येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी बंद खोलीत माय लेकरांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले. चिंचवड पोलिस तपास करीत आहेत.
Edited By - Prashant Patil