Video : 'ती' माऊली करतेय 42 वर्षीय मुलाची शुश्रूषा

mother.jpg
mother.jpg

पिंपरी : पिकले पान कधी गळून पडेल याचा नेम नाही. जन्मल्यापासून पोराला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले. त्याचे लग्न करून दिले आणि संसार सुरू झाला. वाटले आता आराम करावा, पण विपरीत घडले. मुलाला अचानक गॅंगरिंगमुळे अपंगत्व आले. त्याचा पाय निकामी झाला. कायमचा अंथरुणाला खिळला. नात्यागोत्यांनी साथ सोडली. पण आईने साथ सोडली नाही. ज्या वयात मुलांनी आईची सेवा करायची, दुदैवाने त्याच वयात 42 वर्षीय मुलाची शुश्रूषा करण्याची वेळ सत्तर वर्षीय माऊलीवर आली आहे.

काळेवाडीफाटा येथील अशोका सोसायटीत रुक्‍मिणी करोते व त्यांचा मुलगा उमेश राहतात. वडील महावितरणमध्ये वाहन चालक होते. पण हृदयविकाराने ते निवर्तले; पण आई खचली नाही. तिने उमेशसह दोन्ही भावंडांना मोठ केले. त्यांची लग्न लावून दिली. मोठ्या मुलाला अनुकंपा तत्त्वावर काम मिळाले. बहीण नर्स बनली. सगळे ठीक चालले होते. मात्र, अचानक विपरीत घडले. एका खासगी कंपनीत शिपाई म्हणून काम करीत असलेले उमेश यांचे दोन्ही खुबे निकामी झाले. इतकेच नाही तर एका पायात जखम होण्याचे निमित्त झाले आणि डायबिटीसमुळे पूर्ण पायाला गॅंगरिंग झाले. अखेर त्यांचा डावा पाय निकामी झाल्याने कापण्यात आला. पत्नीसह नात्यागोत्यातील माणसेही एकेक करून त्यांना सोडून गेली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दरम्यान, काही मित्रांनी त्यांना मदतीचा हात दिला. पण त्यावरही मर्यादा आल्या. दोन वेळच्या जेवणाचा प्रश्‍न निर्माण झाला. मात्र, सत्तरीतील आईने त्यांची साथ सोडली नाही. मी तर त्याची आई, म्हातारी झालेय म्हणून काय झाले? माझा मुलगा असल्याने मी त्याचा सांभाळ करणार. ""उमेश माझी काळजी करू नकोस, मी काय आज आहे उद्या नाही, आहे तोपर्यंत सांभाळेल,'' असा धीर त्या देतात. दोन्ही भावंडे उमेशकडे लक्ष देत नाहीत. ते आपापल्या संसारात रमलेली. पण आई ती आईच. तिला काळजी उमेशची, त्याला जगविण्यासाठी आई जिवाचे रान करतेय. गेल्या कित्येक वर्ष त्या बाळांची मालिश करण्याचे काम करून गुजराण करीत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून ते दोघे अशाच प्रकारे जगत आहेत.

रेशनिंगवर चूल पेटतीय...
सध्या लॉकडाउनमुळे तेही काम मिळत गेले. रेशनिंगच्या अन्नधान्यावर चूल पेटत आहे. 42 वर्षांच्या मुलाची शुश्रूषा करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. सगळे त्या माऊलीला पहावे लागते, पण आता वय झाले आहे, त्यांना होत नाही. आता त्यांना गरज आहे सामाजिक मदतीची.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com