भरधाव मोटारीनं दिलेल्या धडकेत माय लेकीचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 5 December 2020

भरधाव वेगाने मोटारीने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील माय लेकीचा मृत्यू झाला. ही घटना सांगवी येथे घडली.

पिंपरी : भरधाव वेगाने मोटारीने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील माय लेकीचा मृत्यू झाला. ही घटना सांगवी येथे घडली. सुनीता कपिल उर्फ कपिलकुमार अगरवाल (वय 48, रा. प्रियदर्शनीनगर, लेन क्रमांक 3, जुनी सांगवी ) व त्यांची मुलगी रूपाली (वय 23) अशी या घटनेत मृत्यू झालेल्या मायलेकीची नावे आहेत. मोटारचालक आकाश विनायक गायकवाड (वय 27, रा. महात्मा फुलेनगर मराठी शाळेमागे, दापोडी) याला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. 

याप्रकरणी कपिल उर्फ कपिलकुमार गिरीधरीलाल अगरवाल यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या पत्नी सुनीता व मुलगी रूपाली या शुक्रवारी (ता.4) दुपारी साडेतीनच्या सुमारास दापोडीकडून जुनी सांगवीच्या दिशेने दुचाकीवरून (एमएच 12, आरएच 3380) जात होत्या. तर आरोपी गायकवाड हा त्याच्या मोटारीतून (एमएच 14, सीएच 3414) सांगवीकडून दापोडीच्या दिशेने भरधाव जात होता. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यावेळी दापोडी ते जुनी सांगवी या मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुलाजवळ आरोपीने अगरवाल यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. यामध्ये सुनीता व त्यांची मुलगी रूपाली या दोघीही गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून मोटारचालक आकाश गायकवाड याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mother daughter died road accident on sangavi pimpri chinchwad area

Tags
टॉपिकस
Topic Tags: