पिंपरीत साफसफाई महिला कामगारांचे आंदोलन; काय आहेत मागण्या? वाचा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 27 October 2020

  • कोरोनाकाळातील आर्थिक मदतीत वाढ करा 

पिंपरी : कोरोना काळात महापालिकेच्या सोळाशे साफसफाई महिला कामगारांनी शहर स्वच्छ ठेवण्याचे काम केले. याबद्दल कायम कामगारांना महापालिकेने मोठी आर्थिक मदत दिली. मात्र, कंत्राटी महिलांना अवघे दीड हजार रुपये मदत देण्याचे जाहीर केले. ही मदत पाच हजार रुपये करावी, तसेच पगाराएवढा दिवाळी बोनस द्यावा, अशा मागणीसाठी या महिलांनी महापालिकेसमोर आंदोलन केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

साफसफाई महिला कामगारांचा थकीत भविष्य निर्वाह निधी तातडीने द्यावा, समान काम, समान दाम पद्धत अवलंबवावी, सरकारने ठरवून दिल्याप्रमाणे किमान वेतनाचा फरक मिळवून द्यावा, अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या साफसफाई महिला कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे, घरकुल योजनेत प्राध्यान्य देण्यात यावे, आदी मागण्या आहेत. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कष्टकरी कामगार पंचायतीतर्फे झालेल्या या आंदोलनात कार्याध्यक्ष बळीराम काकडे, भीमा-कोरेगाव संघर्ष समितीचे अध्यक्ष अनिता साळवे, प्रल्हाद कांबळे, सविता लोंढे, मंगल तायडे, मधुरा डांगे, कांताबाई कांबळे, आशा पठारे आदी उपस्थित होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"वीस वर्षांपासून आरोग्य विभागामध्ये कंत्राटी पद्धतीने साफसफाई काम करणाऱ्या महिलांना नियमानुसार महापालिकेने कायम सेवेत घेतले पाहिजे. मात्र, कंत्राटी कामगारांची पिळवणूक सुरू आहे. या पूर्वी देण्यात आलेले ठेके आता संपत आले असून, पुन्हा त्याच ठेकेदारांना आणि इतर ठेकेदारांसाठी पुन्हा निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही निविदा रद्द करून कर्मचाऱ्यांना कायम करावे.'' 
- बाबा कांबळे, अध्यक्ष, कष्टकरी कामगार पंचायत 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: movement of cleaning women workers in Pimpri