विजेच्या धक्क्याने महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू; नवी सांगवीतील घटना

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 11 August 2020

खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करताना विजेचा तीव्र धक्का बसून महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.

नवी सांगवी (पिंपरी चिंचवड) : खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करताना विजेचा तीव्र धक्का बसून महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता. 11) दुपारी बाराच्या दरम्यान येथे घडली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हनुमंत नागनाथ भिसे (वय 32) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. नवी सांगवी परिसरात सोमवार (ता. 10) रात्रीपासून वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. काही भागात कमी दाबाने वीज प्रवाह सुरू होता. त्यामुळे भिसे व त्यांचे सहकारी मंगळवारी दुपारी येथील शनिमंदिर जवळील डीपी दुरुस्तीच्या कामाला आले होते. भिसे डीपीवर चढुन विद्युत प्रवाह सुरळीत करताना अचानक विजेचा झटका बसला. त्यात ते पंचवीस फुटावरून खाली फेकले गेले. 

पिंपरी-चिंचवड पुन्हा रेडझोनमध्ये जाण्यामागची कारणं काय? जाणून घ्या

तेथे उपस्थित असलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने औंध जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. मूळचे लातूर जिल्ह्यातील असलेले भिसे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक बहिण, असा परिवार आहे. याबाबत सांगवी पोलिस अधिक तपास करीत आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: msedcl employee death due to electric shock at navi sangvi