पिंपरी : वीज ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी आजपासून 'हा' कक्ष सुरू करण्यात आलाय

टीम ई सकाळ
शनिवार, 27 जून 2020

जून महिन्यामध्ये मागील दोन महिन्यांसह मीटर रीडिंगनुसार वीजबिल दिल्यानंतरही बहुतांशी ग्राहकांच्या तक्रारी आणि शंका आहेत.

पिंपरी : जून महिन्यामध्ये मागील दोन महिन्यांसह मीटर रीडिंगनुसार वीजबिल दिल्यानंतरही बहुतांशी ग्राहकांच्या तक्रारी आणि शंका आहेत. वाढीव बिलांमुळे ग्राहकांमध्ये असंतोष पसरल्यामुळे तक्रारींचे निवारण करण्यासाठी महावितरणच्या सर्व कार्यालयांमध्ये 'ग्राहक तक्रार निवारण कक्ष' आजपासून (ता. 27) सुरू करण्यात आला आहे. महावितरण कर्मचाऱ्यांनी ग्राहकांच्या घरोघरी जाऊन वीजबिलाबाबत संभ्रम दूर केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पिंपरी चिंचवड शहरात साडेतीन लाख वीजग्राहकांची संख्या आहे. महावितरणला लॉकडाउनमध्ये ग्राहकांकडील मीटरचे रीडिंग घेता आले नाही. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात सरासरी वीज वापरानुसार वीजबिल देण्यात आले. सध्या मीटर रीडींग घेऊन प्रत्यक्ष वीज वापरानुसार एप्रिल व मे महिन्यांसह जून महिन्याचे एकत्रित वीजबिल देण्यात येत आहे. मात्र, अनेकांना सरासरीपेक्षा भरमसाट बिल आल्याची तक्रारी आल्या. 

हेही वाचा- Video : आता आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे प्रदर्शन होणार मोशीत

मोठ्या प्रमाणात या वीजबिलाबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, तो दूर करण्यासाठी महावितरणच्या शाखा, उपविभाग, विभाग, मंडल व परिमंडलस्तरावर ग्राहक तक्रार निवारण कक्ष सुरू करण्याच्या सूचना ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिल्या होत्या. त्यानुसार पिंपरी विभाग आणि भोसरी विभागातील महावितरणमधील तांत्रिक, लेखा, वित्त, आणि माहिती तंत्रज्ञान विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे वेगवेगळे गट तयार करून हे कक्ष सुरु केले आहेत. सकाळी दहा वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ग्राहकांच्या तक्रारी दूर करण्यात येणार आहेत. 

हेही वाचा- Video : पिंपरी-चिंचवडकरांनो दातांच्या समस्यांसाठी दंतचिकित्सकांकडे जाणार असाल, तर ही बातमी वाचा​

भोसरी विभागातील कार्यकारी अभियंता राहुल गवारे यांच्या सूचनेनुसार सहाय्यक अभियंता सुनील रोटे आणि उपव्यवस्थापक महेश क्षीरसागर, सहाय्यक लेखापाल चंद्रकांत मोहरे यांनी भोसरी व दिघी परिसरातील ग्राहकांच्या घरोघरी जाऊन समुपदेशन केले आहे. काही मोठ्या सोसायट्यांमध्ये ग्राहक मेळावेदेखील घेऊन जून महिन्याच्या वीजबिलाची आकारणी सांगण्यात येईल व ग्राहकांच्या तक्रारी व शंका दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

महावितरणच्या https://billcal.mahadiscom.in/consumerbill या लिंकवर ग्राहकांनी वीजबिल तपासून घ्यावे आणि शंका असल्यास नजीकच्या महावितरण कार्यालयांशी संपर्क साधून शंकाचे निरसन करून घेणे आवश्‍यक असल्याची माहिती कार्यकारी अभियंता शिवाजी वायफळकर यांनी दिली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याठिकाणी करा शंकांचे निरसन 

 • पिंपरी मुख्य कार्यालय 
 • बिजलीनगर सबडिव्हीजन कार्यालय 
 • खराळवाडी सबडिव्हीजन कार्यालय 
 • एम्पायर इस्टेट सबडिव्हीजन कार्यालय 
 • कुणाल आयकॉन, सबडिव्हीजन कार्यालय 
 • वाकड सबडिव्हीजन कार्यालय 
 • सांगवी सबडिव्हीजन कार्यालय 
 • 'ड'प्रभाग सबडिव्हीजन कार्यालय 
 • आकुर्डी सबडिव्हीजन कार्यालय 
 • प्राधिकरण सबडिव्हीजन कार्यालय 
 • भोसरी सबडिव्हीजन कार्यालय

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MSEDCL has started 'Consumer Grievance Redressal Cell' for redressal of grievances