esakal | मुळशीतून विसर्ग वाढविला; वाकड, पिंपळे निलख, जुनी सांगवी, दापोडीला अतिदक्षतेचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

मुळशीतून विसर्ग वाढविला; वाकड, पिंपळे निलख, जुनी सांगवी, दापोडीला अतिदक्षतेचा इशारा

मुळशी धरणातून आज शुक्रवारी, सकाळी दहा वाजेपासून 12 हजार क्युसेकने विसर्ग सुरू केला आहे.

मुळशीतून विसर्ग वाढविला; वाकड, पिंपळे निलख, जुनी सांगवी, दापोडीला अतिदक्षतेचा इशारा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : मुळशी धरणातून आज शुक्रवारी, सकाळी दहा वाजेपासून 12 हजार क्युसेकने विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे आता एकूण विसर्ग 16 हजार 247 ने सुरू झाला आहे. मुळा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असून, नदीकाठच्या वाकड, पिंपळे निलख, जुनी सांगवी, दापोडी, बोपखेल, पुण्यातील खडकी, बाणेर, बोपोडी, औंध गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत मुळशी धरण प्रमुख (टाटा पॉवर) बसवराज मुन्नोळी यांनी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका पूर नियंत्रण कक्ष, पुणे-पिंपरी-चिंचवड, पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता, शाखा अभियंता पिरंगूट, मुळशी तहसीलदार मुळशी व पोलिसांना कळविले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

मुळशी तालुक्यात मुळा नदीवर मुळशी धरण आहे. मुळा नदी मुळशी तालुक्यातून येऊन वाकड व बाणेरच्या शिवेवर पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात प्रवेश करते. जुनी सांगवी येथे मुळा व पवना नदीचा संगम होतो. संगमाच्या एका बाजूला पुण्यातील बोपोडी व दुसऱ्या बाजूला पिंपरी-चिंचवडमधील दापोडी आहे. येथून पुढे मुळा नदी पुण्यात मुठा नदीला मिळते. येथून पुढे त्यांची ओळख मुळा-मुठा अशी होते. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मुळशी धरण पाणलोट क्षेत्रातील पर्ज्यन्यमानानुसार त्यामध्ये वाढ संभवू शकतो. त्यामुळे कृपया धरणाच्या खालील भागातील नदीकाठची गावे, वाड्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षेच्या कारणास्तव नदीपात्रात प्रवेश करू नये. विजेवरील मोटारी, इंजिने, शेती अवजारे अथवा तत्सम साहित्य तसेच, पशुधन यांचेही सुरक्षिततेची काळजी घेऊन कोणत्याही प्रकारे जीवीत वा वित्तहानी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन मुन्नोळी यांनी केले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Edited by Shivnandan Baviskar

loading image
go to top