मुळशी पंचायत समिती सभापतीने दाखवले पिस्तूल; 7 जणांवर गुन्हा दाखल

माण येथील प्रकार; सभापतीसह सात जणांवर गुन्हा
Crime News
Crime Newsesakal

पिंपरी : गटार व रस्त्याच्या कामाला जमीन मालकाने हरकत घेतल्याने मुळशी पंचायत समितीच्या सभापतीने जमीन मालकाला पिस्तूल दाखवून शिवीगाळ केली. तसेच सभापती व त्यांच्या सहा साथीदारांनी तिघांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी सभापतीसह सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार हिंजवडी फेज दोन, माण येथे घडला.

याप्रकरणी रामनारायण एकनाथ पारखी (रा. माण) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सभापती पांडुरंग मारुती ओझरकर (रा. माण), नितीन बाळू कुंटे (वय २५, रा. चांदे-लवळे), गणेश शिंदे, रोशन बाळकृष्ण ओझरकर (वय २८, रा. माण), रामदास गवारे, नवनाथ आनंदा गवारे उर्फ गवारी, यशवंत गवारे (सर्व रा. माण) यांच्यावर गुन्हा दाखल आहे.

Crime News
मराठा क्रांती मोर्चासह इतर संघटनांची पुण्यात बैठक

फिर्यादी यांची सर्वे नं ५९४ मध्ये जमीन आहे. त्यापैकी सर्वे नं ३०५ मध्ये पाच एकर असलेल्या जमिनीपैकी तीन एकर जमीन एमआयडीसीने आरक्षित केली आहे. व राहिलेली दोन एकर जमिन ही फीर्यादी यांचे सख्खे व चुलत भावांच्या नावे आहे. त्यामधुन माण ग्रामपंचायत तर्फे गटार रस्ता व इतर कामे केली जात आहेत. या कामांसाठी फिर्यादी यांची हरकत आहे. तरीही एस. के. एंटरप्रायझेस तर्फे खोदकाम चालू केले. त्यास फिर्यादी व त्यांच्या भावांनी हरकत घेतली आणि पावसाळा संपल्यावर निर्णय घेण्याचे ठरले. त्यानंतर बुधवारी (ता.. ४) दुपारी तीनच्या सुमारास पंचायत समितीचे सभापती ओझरकर यांनी त्याठिकाणी येऊन त्यांच्याकडील पिस्तूल दाखवून शिवीगाळ करीत सिमेंटच्या ब्लॉकने फिर्यादी यांचा पुतण्या सुरज पारखी यांच्या डोक्यात मारुन जखमी केले. तसेच फिर्यादी यांचा मुलगा विश्वनाथ रामनारायण पारखी यास हाताने मारहाण केली. तर आरोपी नितीन, गणेश, रोशन यांनी दगडाने मारहाण केली. तसेच आरोपी रामदास, नवनाथ, यशवंत यांनी संगनमत करुन अन्य आरोपींना एकत्र बोलावुन रोडवर गाडया आडव्या लावुन त्यांचा रस्ता आडवून मारहाण व शिवीगाळ केली. पोलिसांनी नितीन, रोशन, नवनाथ या तिघांना अटक केली आहे.

Crime News
पुन्हा एकदा हॅपी बर्थडे

शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा

तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी महेश रामहरी पारखी, जय रामहरी पारखी, नितीन पारखी, सोमनाथ प्रकाश कसाळे, रामहरी पारखी, सुरज पारखी, विश्वनाथ पारखी (पुर्ण नाव माहीती नाही. सर्व रा. माण ता. मुळशी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी भरत रावण पाटील (रा. कोथरूड, पुणे) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बुधवारी (ता. ४) दुपारी साडेतीनच्या सुमारास फेज दोन येथील सर्व्हे क्रमांक ३०६ मधील फक्कड गवारे यांच्या मालकीच्या जागेवर आरोपी एकत्र जमले. तेथे माण ग्रामपंचायत तर्फे सुरु असलेले गटारीचे काम आरोपींनी बंद पाडत शासकीय कामास अटकाव केला केला. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Crime News
मराठा क्रांती मोर्चासह इतर संघटनांची पुण्यात बैठक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com