पिंपरी महापालिकेची सव्वा पाच कोटींच्या कामांना मंजूरी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 24 June 2020

पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकासकामांसाठी येणाऱ्या सुमारे पाच कोटी 27 लाख रकमेच्या खर्चास महापालिका स्थायी समिती सभेने बुधवारी मान्यता दिली.

पिंपरी : कोरोना संसर्ग झालेल्यांच्या संपर्कातील, परदेशवारीवरून आलेले व अन्य भागातून प्रवास करून आलेल्या व्यक्तींना क्वारंटाइन केले आहे. ताथवडेतील कॉलेजच्या वसतिगृहात क्‍वारंटाइन केलेले नागरिक निघून जात होते. त्यांना अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी थोपविले होते. तसेच, जाधववाडी-चिखली येथे वाहनाअभावी गरोदर महिला, तिचा पती व दोन मुले लॉकडाउनच्या काळात अडकून पडले होते. त्यांना तातडीने पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात महापालिका विद्युत विभागातील तीन कर्मचाऱ्यांनी दाखल केले होते. या सर्वांचा स्थायी समिती सभेत बुधवारी सन्मान करण्यात आला.  पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकासकामांसाठी येणाऱ्या सुमारे पाच कोटी 27 लाख रकमेच्या खर्चास महापालिका स्थायी समिती सभेने बुधवारी मान्यता दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते. 

सॅनिटायजर कोरोनापासून सुरक्षा देतंय पण 'या' धोक्याचं काय?

फ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कृष्णानगर व इतर ठिकाणी व्हॉल्व्ह ऑपरेशन व्यवस्थापन करणेसाठी मजूर पुरवण्यासाठी 74 लाख 27 हजार रुपये, फुगेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरणासाठी 36 लाख रुपये, प्रभाग 19 मधील गोलांडे उद्यानाशेजारील सीडी वर्कच्या कामांसाठी 29 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. 

जगातील सर्वात मोठे कोविड रुग्णालय 'या' राज्यात सुरु होणार; वाचा किती असेल क्षमता

ताथवडे येथील बालाजी कॉलेज हॉस्टेल येथे महापालिका हद्दीतील काही कोरोना बाधित रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यातील काही जणांनी उपचार पूर्ण होण्यापूर्वी तेथून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच अतिरिक्त आयुक्त पवार तिथे पोचले. त्यांनी संबधितांना रोखले व कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात रोखण्यात मदत झाली. त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

लॉककडाऊनच्या काळामध्ये जाधववाडी चिखली येथे रस्त्यामध्ये वाहन उपलब्ध नसल्याने अडकून पडलेल्या गरोदर महिलेला विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मदत केली होती. त्यात वाहनचालक रामदास गवारी, वायरमन अंकुश लांडगे, मदतनीस विलास माने यांचा समावेश होता. त्यांनी तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करून महिलेचे प्राण वाचवले, त्याबद्दल संबंधित वाहनचालक, वायरमन व मदतनीस यांचा सत्कार करण्यात आला.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muncipal corporation for more than 5 crore for development