esakal | महापालिका प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांची रायगडला बदली
sakal

बोलून बातमी शोधा

Jyotsna Shinde

महापालिका प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांची रायगडला बदली

sakal_logo
By
आशा साळवी

पिंपरी - महापालिका (Municipal) शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे (Jyotsna Shinde) यांची जिल्हा रायगडमध्ये शिक्षणाधिकारी (माध्यमिक) बदली (Transfer) करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या पुण्यातील बोगस शिक्षक भरती प्रकरण, शालेय साहित्य वाटपातील अनियमितता या प्रकरणामूळे कायम त्या वादग्रस्त ठरल्या होत्या. गेल्या महिन्यापासून त्यांच्या बदली करण्याबाबत प्रशासकीय हलचाली सुरू होत्या.

ज्योत्स्ना शिंदे ह्या महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी म्हणून २६ मे २०१८ मध्ये रूजू झाल्या होत्या. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ४ डिसेंबर २०१७ मध्ये शिक्षण अधिकारी बी. एस. आवारी यांच्या बदलीच्या रिक्त झालेल्या जागेवर शिंदे त्यांची नियुक्ती केली होती. पुण्यातील प्राथमिक शिक्षण विभागातील शालेय पोषण आहार कक्षाच्या सहायक संचालक म्हणून शिंदे यांनी काम पाहिले. आता राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत.

हेही वाचा: पिंपरी ; गरीब घरातील मुलांसाठी ऑनलाइन गुरू’ ॲप

संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या पुण्यातील बोगस शिक्षक भरती प्रकरणात आरोपी शिंदे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेची बदनामी झाल्याचा ठपका त्यांच्यावर होता. शिक्षक भरती घोटाळ्यात त्यांचा जामिन अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर पालिकेत हजेरी लावणा-या अधिकारी शिंदे यांना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी रुजू करून घेतले. त्यांनी महापालिका कामकाजात देखील अफरातफर केल्यावरून त्यांच्या संपूर्ण कामकाजाची आणि त्यांच्या संपत्तीची कसून चौकशी करण्याची मागणी काही राजकीय संघटनांनी केली होती.

loading image
go to top