Breaking : पिंपरी कॅम्पबाबत महापालिका आयुक्तांनी काढला नवा आदेश, काय आहे वाचा...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 मे 2020

पिंपरी कॅम्प नजिकच्या भाटनगर, बौद्धनगर व वैष्णव देवी मंदिर परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यांची झपाट्याने वाढ होत आहे.

पिंपरी : पिंपरी कॅम्प नजिकच्या भाटनगर, बौद्धनगर व वैष्णव देवी मंदिर परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यांची झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे हे परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर केले आहेत. तसेच, सोशल डिस्टन्सिंग व सम-विषम तारखेनुसार कॅम्पातील दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र, याकडे व्यापाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे संपूर्ण कॅम्प परिसर 31 मेपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (मंगळवार) दिला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी कॅम्प परिसरात शगून चौक, कराची चौक, साई चौक, आर्य समाज चौक, गेलार्ड चौक, माता रमाबाई आंबेडकर चौक, डिलक्स चौक, संत गाडगे महाराज चौक, मेन बाजार लेन, रिव्हर रोड, रेल्वे स्टेशन रोड आदी परिसराचा समावेश होतो. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सोशल डिस्टंसिंग नियमाचे पालन करावे, सम-विषम तारखेनुसार दुकाने सुरू ठेवावे, गर्दी टाळावी या अटीनुसार पिंपरी कॅम्पातील दुकाने उघडण्यास आयुक्तांनी दोन दिवसांपूर्वी परवानगी दिली होती. मात्र, कोणीही नियम पाळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे 31 मेपर्यंत पिंपरी कॅम्प बंद ठेवण्यात येत आहे, असे आयुक्त हर्डीकर यांनी आदेशात म्हटले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पिंपरी कॅम्प ही पिंपरी चिंचवड शहरासह लगतच्या खेड तालुक्यातील चाकण, आळंदी, धानोरे, चऱ्होली, केडगाव, चिंबळी, महाळुंगे, निघोजेसह देहू, देहूरोड, सोमाटणे, हिंजवडी, माण, मारुंजी, जांभे, कासारसाई आदी गावांसाठी मोठी बाजारपेठ आहे. अनेक नागरिक येथे खरेदीसाठी येत असतात. दोन दिवसांपूर्वी सुरू झालेली बाजारपेठ पुन्हा बंद ठेवण्यात येणार आहे. ती पुन्हा सुरू होण्यासाठी आणखी पाच दिवस वाट पहावी लागणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal Commissioner orders to keep Pimpri Camp closed till May 31