महापालिका आयुक्तांचे पदाधिकाऱ्यांकडून कौतुक;आयुक्तांनी केलेले काम वाखाणण्याजोगे

महापालिका आयुक्तांचे पदाधिकाऱ्यांकडून कौतुक;आयुक्तांनी केलेले काम वाखाणण्याजोगे
Updated on

पिंपरी - महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची एक जानेवारी रोजी सचिवपदी पदोन्नती झाली आहे. त्याबद्दल त्यांचा महापालिकेतर्फे महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महापौरांसह पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांवर कौतुकाचा वर्षाव केला. ""कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीत शहरातील परिस्थिती सावरण्यासाठी आयुक्तांनी केलेले काम वाखाणण्याजोगे असून, शहराच्या कायम स्मरणात राहील,'' असे गौरवोद्‌गार महापौरांनी काढले. 

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत कार्यक्रम झाला. स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, नगररचना उपसंचालक रा. म. पवार, मुख्यलेखापरीक्षक अमोद कुंभोजकर, शहर अभियंता राजन पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण आदी उपस्थित होते. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

महापौर ढोरे म्हणाल्या, ""कोरोना काळात आयुक्त हर्डीकर यांनी वेळीच दक्षता घेऊन नियोजन केले. हे काम प्रादुर्भाव रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे. नागरिक आणि पोलिसांनीही चांगले सहकार्य केले.'' लोकांसाठी काम करण्याची संधी पुन्हा पुन्हा येत नाही. त्यामुळे शहर विकासात लक्षात राहील, अशी कामे करा. करदात्यांच्या पैशाचा विनियोग योग्य पद्धतीने करण्याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे. पाण्याचे व्यवस्थापन करून नागरिकांना मुबलक शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी तातडीने नियोजन करा, अशा सूचनाही त्यांनी केली. कोणतेही काम प्रलंबित राहणार नाही, याची खबरदारी प्रत्येक विभागाने घ्यावी, असा आदेशही दिला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com