esakal | अकरावीच्या विद्यार्थ्यांनो, 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' फेरीद्वारे होणार अॅडमिशन
sakal

बोलून बातमी शोधा

Students_Admission

दरम्यान विशेष फेरीच्या शेवटी प्रवेशाचे प्रमाण वाढण्यापेक्षा विलंब होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच बरेच विद्यार्थी अद्यापही प्रवेशाविना राहिलेले आहेत.

अकरावीच्या विद्यार्थ्यांनो, 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' फेरीद्वारे होणार अॅडमिशन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवडसह मुंबई-ठाणे, नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद या महापालिका क्षेत्रातील सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या पुढील टप्प्यासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (एफसीएफएस) फेऱ्यांचे आयोजन करण्याला मान्यता देण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाने गुरूवारी अध्यादेश काढून ही माहिती दिली आहे. त्यामुळे आतापर्यंत अकरावीच्या प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या पुढील टप्प्यात 'एफसीएफएस'द्वारे प्रवेशाची संधी मिळणार आहे.

आजारी सहकाऱ्याच्या भेटीसाठी टाटांनी गाठलं पुणे; चर्चा तर होणारच!​

कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे 2020-21 मधील प्रवेश प्रक्रिया जुलै 2020 पासून सुरू झाली. यंदा कोरोनामुळे प्रवेश प्रक्रियेला बराच विलंब झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत अधिक सुसूत्रतता आणण्यासाठी 23 जुन 2020मध्ये काही बदल करण्यात आले. त्यात शासन निर्णयानुसार प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही फेरी रद्द करण्यात आली होती. त्याऐवजी आवश्‍यकतेनुसार अतिरिक्त विशेष फेरीची प्रक्रिया राबविण्यात येणार होती. यात एफसीएफएस फेरी रद्द करून त्याऐवजी आवश्‍यकतेनुसार जेथे सर्व रिक्त जागा या सर्वसाधारण जागांमध्ये रुपांतरित करण्यात येतील आणि आरक्षणाऐवजी विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्ता यादीतील गुणांवर आधारित जागा देण्यात येतील, असे जूनमध्ये काढलेल्या अध्यादेशात नमूद केले होते.

पुणे : तनिष्क ज्वेलर्समधून महिलांनी 4 लाखाच्या सोन्याच्या बांगड्या केल्या लंपास!

मात्र, दरम्यान विशेष फेरीच्या शेवटी प्रवेशाचे प्रमाण वाढण्यापेक्षा विलंब होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच बरेच विद्यार्थी अद्यापही प्रवेशाविना राहिलेले आहेत. ही परिस्थिती विचारात घेता, यावर्षीही प्रवेशासाठी शेवटच्या टप्प्यात नियमित फेऱ्यांऐवजी "एफसीएफएस" फेरीचे आयोजन करण्याबाबत विचार सुरू होता. त्याला राज्य सरकारने आता मान्यता दिली आहे. या संदर्भात राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी बुधवारी ट्‌विटरद्वारे माहिती दिली होती. त्यानंतर शालेय शिक्षण विभागाने त्वरीत गुरूवारी "शैक्षणिक वर्ष 2020-21मध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी एफसीएफएस फेरीचे आयोजन करण्यास मान्यतेबाबत नवा अद्यादेश काढला आहे. त्यामुळे अकरावीच्या उर्वरित प्रवेशासाठी "प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' फेरीअंतर्गत प्रवेश दिला जाणार आहे.

ऐन थंडीत पुणेकर पावसात न्हाहले; अचानक आलेल्या पावसाने उडाली तारांबळ

दुसऱ्या विशेष फेरीत गुरूवारपर्यंत अडीच हजार विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील जवळपास 304 कनिष्ठ महाविद्यालयांमधील प्रवेशाच्या दुसऱ्या विशेष फेरीसाठी आठ हजार 419 विद्यार्थी पात्र ठरले. त्यातील पाच हजार 555 विद्यार्थ्यांना या फेरीत प्रवेश देण्यात आला आहे. प्रवेशासाठी शुक्रवारपर्यंतची (ता.8) मुदत असली, तरी गुरूवारी सायंकाळपर्यंत जवळपास तीन हजार 159 विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी संमती दर्शविली. तर सुमारे दोन हजार 583 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. या फेरीत दोन हजार 396 विद्यार्थ्यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नसल्याचे दिसून आले आहे.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)