esakal | खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचाच तीन चोरट्यांकडून खून!
sakal

बोलून बातमी शोधा

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचाच तीन चोरट्यांकडून खून!
  • चोरट्यांना प्रतिकार केल्याने घेतला जीव 
  • खुनाच्या गुन्ह्यात तात्पुरत्या जामिनावर सुटलेल्या आरोपीचा खून करणाऱ्या दोघांना अटक 
  • कोरोनामुळे तात्पुरत्या जामिनावर झाली होती सुटका

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचाच तीन चोरट्यांकडून खून!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : खुनाच्या गुन्ह्यात तात्पुरत्या जामिनावर सुटका झालेल्या आरोपीला तीन चोरट्यांनी लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, खुनातील आरोपीने प्रतिकार केल्याने तिघांनी मिळून त्याचा खून केला. याप्रकरणी आळंदी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना २३ फेब्रुवारीला आळंदीतील इंद्रायणी नदी घाटावर घडली होती. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महादेव श्याम खंदारे (वय ३०) असे खून झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी संतोष ऊर्फ कांच्या केरबा कांबळे (वय १९, रा. काळेवाडी, देहूफाटा, आळंदी), केतन प्रकाश शिंदे (वय १८, नगरपरिषद जवळील झोपडपट्टी, आळंदी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचा साथीदार देविदास ऊर्फ देव्या बबन चौरे (रा. हडपसर) हा पसार आहे. २३ फेब्रुवारीला एका नागरिकाला आळंदीतील इंद्रायणी नदीच्या घाटावर एका व्यक्तीचा मृतदेह दिसला.  याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला. मृताच्या मोबाईलवरून त्याची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले.

गज्या मारणे टोळीवर पुन्हा एक नवीन गुन्हा दाखल

आळंदी पोलिसांनी दोन पथके तयार करून गुन्ह्याचा तपास सुरू केला. संतोष आणि केतन या दोघांना संशयावरून ताब्यात घेऊन चौकशी केली असता, आरोपींनी त्यांच्या देविदास नावाच्या साथीदारासोबत मिळून हा गुन्हा केल्याचे कबूल केले. आळंदी घाटावर फिरत असताना महादेव खंदारे यांच्याकडील ऐवज जबरदस्तीने चोरताना त्यांच्यात झालेल्या वादातून हा प्रकार केल्याची कबुली आरोपींनी दिली. खंदारे याच्यावर तळेगाव - दाभाडे पोलिस ठाण्यात २०१६ मध्ये खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्यात त्याला अटक झाली असून, तो सध्या कारागृहात होता. कोरोना संसर्ग काळात त्याला तात्पुरत्या जामिनावर सोडण्यात आले होते. तर, आरोपी संतोष आणि केतन हे अल्पवयीन असताना त्यांच्यावर गुन्हे दाखल होते. आळंदी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

loading image
go to top