esakal | गज्या मारणे टोळीवर पुन्हा एक नवीन गुन्हा दाखल

बोलून बातमी शोधा

गज्या मारणे टोळीवर पुन्हा एक नवीन गुन्हा दाखल}

- मोकाअंतर्गत होणार कारवाई 

गज्या मारणे टोळीवर पुन्हा एक नवीन गुन्हा दाखल
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर मुंबई-पुणे महामार्गावर मिरवणूक काढल्याप्रकरणी कुख्यात गज्या उर्फ गजानन मारणे व त्याच्या साथीदारांवर तळेगाव पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर मोकाअंतर्गत कारवाई केली जाणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली. तसेच, अगोदरच्या गुन्ह्यात फरारी असलेला मारणे चार दिवसांपूर्वी  न्यायालयात हजर झाला व जामीन मिळवून निघूनही गेला. याची पोलिसांना कसलीच खबर लागली नव्हती. यावर कृष्ण प्रकाश यांनी खंत व्यक्त करीत मारणे याला पकडण्यात पोलिस कुठे तरी कमी पडल्याचे स्पष्ट केले. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लोकहो, दंड भरण्यापेक्षा मास्क वापरा!

मारणे व त्याच्या इतर सात साथीदारांविरुद्ध पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील तळेगाव दाभाडे व हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झालेले आहेत. तळेगाव टोल नाक्याच्या गुन्ह्यात खंडणीचे कलम वाढवले जाणार आहे. यासह कोथरुड पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल करत त्याला व इतर नऊ जणांना अटक केली होती. पोलिसांनी न्यायालयात हजर केल्यानंतर शिवाजीनगर न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला. यानंतर वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल केला, पण तोपर्यंत गज्या मारणे फरार झाला. त्याच्या शोधासाठी पथके देखील रवाना केली. त्याचे फार्महाऊस आणि कुटुंबाकडे चौकशी सुरू केली. तळेगाव दाभाडे येथील गुन्ह्याप्रकरणी मारणे हा वडगाव मावळ न्यायालयात हजर झाला. याप्रकरणी त्याला जामीन मिळाला. यानंतर तो निघून देखील गेला आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, पोलिस दल त्याच्या मागावर असताना दररोज त्याचा वेगवेगळ्या ठिकाणी पोलिस शोध घेत आहेत. असे असताना तो न्यायालयात हजर होऊन जामीन मिळवून निघूनही गेला. याची पोलिसांना कसलीच खबर लागली नव्हती. यावर पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी खंत व्यक्त करीत मारणेला पकडण्यात पोलिस कुठे तरी कमी पडल्याचे स्पष्ट केले. तसेच, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अद्यापपर्यंत 14 वाहने जप्त केली असून, 36 आरोपींना अटक केली आहे.