बाणेरमध्ये एकाचा निर्घृण खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 December 2020

मृत संदीप माईनकर हे फिर्यादी यांचे वडील आहेत. संदीप यांचा अज्ञात आरोपींनी धारदार हत्याराने भोसकून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी संदीप यांचा मृतदेह बाणेर येथील उदनशाहवली दर्गा येथील कंपाउंड आणि होर्डिंगच्या मधील मोकळ्या जागेत टाकला. त्यावर ज्वलनशील पदार्थ ओतून मृतदेह पेटवून दिला​

पिंपरी : धारदार हत्याराने भोसकून एकाचा खून केला. त्यानंतर मृतदेह पेटवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार बाणेर येथे घडला. 

संदीप पुंडलिक माईनकर (रा. म्हाडा सोसायटी, संत तुकारामनगर, पिंपरी. मूळ रा. माईन, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आशिष संदीप माईनकर (वय 28) यांनी याबाबत हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मृत संदीप माईनकर हे फिर्यादी यांचे वडील आहेत. संदीप यांचा अज्ञात आरोपींनी धारदार हत्याराने भोसकून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी संदीप यांचा मृतदेह बाणेर येथील उदनशाहवली दर्गा येथील कंपाउंड आणि होर्डिंगच्या मधील मोकळ्या जागेत टाकला. त्यावर ज्वलनशील पदार्थ ओतून मृतदेह पेटवून दिला. हा प्रकार रविवारी (ता.29) सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आला.

याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरूद्ध खून व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

पदवीधर, शिक्षकांना मतदानासाठी विशेष रजा मंजूर होणार - शिक्षणाधिकारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder of one in Baner Bodies were burnt to destroy evidence