
शाब्दिक वादातून पाच जणांनी मिळून मुंबईत कार्यरत असलेल्या एका पोलिस महिला कर्मचाऱ्याच्या पतीचा खून केला.
पिंपरी : शाब्दिक वादातून पाच जणांनी मिळून मुंबईत कार्यरत असलेल्या एका पोलिस महिला कर्मचाऱ्याच्या पतीचा खून केला. ही घटना हिंजवडी येथील लक्ष्मी चौकात घडली.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
राजकुमार मुरलीधर घुगे (वय 48, रा. एमआयडीसी पोलिस वसाहत, महेश्वरीनगरजवळ, अंधेरी ईस्ट, मुंबई) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी रमेश तुकाराम गायकवाड (रा. कांदिवली, मुंबई ईस्ट) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. नंदकुमार श्रीपतराव ढोकळे (वय 55), प्रमोद नंदकुमार ढोकळे (वय 32, दोघेही रा. नारायण कॉम्प्लेक्स, हिंजवडी) व प्रशांत नंदकुमार ढोकळे (वय 35, रा. जाधव वस्ती, ता. मुळशी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यासह आणखी दोन साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे.
- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
मृत राजकुमार व आरोपी नंदकुमार यांची गुरुवारी (ता. 4) रात्री सव्वा अकराच्या सुमारास हिंजवडीमधील एका वाइन शॉपसमोर असताना, स्नॅक्स देण्याच्या कारणावरून शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर फिर्यादी रमेश, राजकुमार व त्यांचे मित्र लक्ष्मी चौकातील एका हॉटेलमधून जेवण करून हॉटेलच्या बाहेर आले. दरम्यान, आरोपींनी संगनमत करून राजकुमार यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यात गंभीर जखमी झाल्याने राजकुमार यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी रमेश यांना इथे न थांबता पुणे सोडून जाण्याची धमकी दिली. राजकुमार यांच्या पत्नी मुंबईत पोलिस दलात कार्यरत आहेत.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा