esakal | जुने भांडण बेतले जिवावर; हिंजवडीत तिघांकडून मित्राचाच खून
sakal

बोलून बातमी शोधा

जुने भांडण बेतले जिवावर; हिंजवडीत तिघांकडून मित्राचाच खून
  • जुन्या भांडणाच्या रागातून तिघांनी मिळून मित्राचाच धारदार हत्याराने वार करून खून केला.

जुने भांडण बेतले जिवावर; हिंजवडीत तिघांकडून मित्राचाच खून

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : जुन्या भांडणाच्या रागातून तिघांनी मिळून मित्राचाच धारदार हत्याराने वार करून खून केला. ही घटना हिंजवडी येथे घडली. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

निवल सुकलाल पावरा (वय 27, रा. साखरे वस्ती, हिंजवडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नी हिरा पावरा यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार बबल्या ऊर्फ महेंद्र तेलगोटे, गोल्या ऊर्फ शरद पवार (दोघेही रा. साखरे वस्ती, हिंजवडी) व सागर कदम (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. शनिवारी (ता. 21) रात्री दहाच्या सुमारास आरोपी हे पावरा यांच्या घरी आले. तुझ्याकडे महत्त्वाचे काम आहे, असे सांगून निवल पावरा यांना सोबत घेऊन गेले. त्यानंतर जुन्या भांडणाचा राग मनात धरून हिंजवडीतील रेडिसन ब्लू हॉटेलच्या पाठीमागील मोकळ्या जागेत निवल यांच्या डोक्‍यात धारदार शस्त्राने वार करून दगड घातला. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने निवल यांचा मृत्यू झाला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.