esakal | पिंपरी-चिंचवड : दिवाळीनंतर खवय्यांचा पुन्हा मटण, चिकनवर ताव
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवड : दिवाळीनंतर खवय्यांचा पुन्हा मटण, चिकनवर ताव

कोरोनाच्या सावटात दिवाळीची धामधूम संपली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेकांनी घराघरांत दिवाळीच्या फराळाचा आनंद घेतला. मात्र, आता कंटाळलेल्या खवय्यांकडून मिठाईनंतर मटण, चिकनवर ताव मारला जात आहे. परिणामी, चिकन व अंड्यांना मागणी वाढल्याने दरातही वाढ झाली आहे.

पिंपरी-चिंचवड : दिवाळीनंतर खवय्यांचा पुन्हा मटण, चिकनवर ताव

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी - कोरोनाच्या सावटात दिवाळीची धामधूम संपली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेकांनी घराघरांत दिवाळीच्या फराळाचा आनंद घेतला. मात्र, आता कंटाळलेल्या खवय्यांकडून मिठाईनंतर मटण, चिकनवर ताव मारला जात आहे. परिणामी, चिकन व अंड्यांना मागणी वाढल्याने दरातही वाढ झाली आहे.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे तीन हजार नोंदणीकृत चिकन सेंटर आहेत. कोरोनामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढीला अंडी, चिकन फायदेशीर असल्याचे सांगितले जात आहे. परिणामी, गेल्या तीन महिन्यांपासून अंडी, चिकनला वीस ते पंचवीस टक्के मागणी वाढल्याने दरातही सुधारणा झाली आहे. सध्या दररोज २५ ते ३० टन चिकनचा खप आहे, तर अडीच ते तीन लाख अंड्यांची विक्री होत आहे. एकेका किरकोळ दुकानदाराकडे दिवसाला २०० नग अंड्यांची विक्री होते. मागणीमुळे घाऊकमध्ये दीड ते दोन रुपयांनी भाववाढ झाली. पूर्वी साडेचार ते पाच रुपयांना विकणारे अंडे आता पाच ते सव्वापाच रुपयांना मिळते. त्यामुळे किरकोळ बाजारात प्रतिअंड्याचे दर सहा रुपये झाल्याचे चिकन विक्रेते अरमान शेख यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहरात 246 नवीन रुग्ण; तर सात जणांचा मृत्यू

ब्रॉयलरला पसंती
गावरान चिकन महाग असल्याने ब्रॉयलर चिकनला मोठी मागणी आहे. घाऊक बाजारात साधारण १७० रुपये किलो दराने विकले जाणारे ब्रॉयलर चिकन सध्या १९० ते २०० रुपयांपर्यंत प्रतिकिलो दराने किरकोळ विक्री होते. गावरान चिकनचे दरही घाऊकमध्ये १५० ते १७० असून, किरकोळ दर ३०० रुपये किलोच्या घरात आहेत. मार्च महिन्यात झालेल्या नुकसानीमुळे अनेकांनी नव्याने कुक्कुटपालन बंद केल्याने ही तूट निर्माण झाली आहे.

राज्यातील आघाडी सरकार म्हणजे पलटूराम : देवेंद्र फडणवीस

कच्चा माल महागला
मका आणि सोया खाद्याची ७५ टक्के उपलब्धता असल्याने दरात वाढ झाली आहे. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातून मका आवक होते. सध्या वाहतूक मंद आहे. परिणामी, उपलब्ध मालाचे दर वाढले 
आहेत. 

पाहुणचाराची जोड; उलाढाल वाढली
गोड जेवण, फराळाला कंटाळून तिखट मसालेदार मांसाहाराला पसंती आहे. अनेकांनी भाऊबिजेनंतर घराघरांत सामिष जेवणाची मेजवानी दिली; परिणामी चिकन, मासे, मटणाला मागणी वाढू लागली होती. आता विविध हॉटेल व ढाब्यांवरची गर्दी वाढत आहे. मटण विक्री तेजीत येऊन मांसाहारी पदार्थांना मोठी मागणी असल्याने विक्रेत्यांना नऊ महिन्यांनंतर अच्छे दिन आले आहेत.

शहरात बारामतीहून चिकनला नियमित मागणी असते. मात्र, मागणीपेक्षा दहा टक्के कमी उत्पादन होत असल्याने दरही वाढले आहेत. अंड्यांची मागणी २५ टक्‍क्‍यांनी वाढली आहे. गेल्या सहा महिन्यांतील नुकसानीमुळे अंड्यांचे उत्पादन कमी झाल्याने दर वाढले. चिकन व अंड्यांचा मागणीनुसार उत्पादन, पुरवठा व्हायला अजून चार महिन्यांचा तरी कालावधी लागेल. 
- अमजद इनामदार, व्यावसायिक, सानिया पोल्ट्री

Edited By - Prashant Patil

loading image