esakal | पिंपरी-चिंचवडकरांनो, आता घरोघरी राबविली जाणार 'ही' मोहीम
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवडकरांनो, आता घरोघरी राबविली जाणार 'ही' मोहीम
 • महापालिका आयुक्त हर्डीकर यांची माहिती
 • 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेसाठी 2166 स्वयंसेवक 

पिंपरी-चिंचवडकरांनो, आता घरोघरी राबविली जाणार 'ही' मोहीम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारच्या आदेशानुसार शहरात 15 सप्टेंबर ते 24 ऑक्‍टोबर या कालावधीत 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी दोन हजार 166 स्वयंसेवक नियुक्त केले जाणार आहेत. लोकप्रतिनिधी व महिला बचत गटांकडून प्रत्येकी 12 स्वयंसेवक घेण्याचे नियोजन आहे, असे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

'माझे कुटुंब माझी जबाबदारी', मोहिमेच्या पूर्व तयारीसाठी महापालिका भवनात आयोजित बैठकीत आयुक्त बोलत होते. महापौर उषा ढोरे अध्यक्षस्थानी होत्या. आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, उपमहापौर तुषार हिंगे, पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, मनसे गटनेते सचिन चिखले, नगरसेवक विलास मडिगेरी, अभिषेक बारणे, राजेंद्र गावडे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते. महापौर म्हणाल्या, "मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. यामुळे कोरोना आटोक्‍यात आणण्यास मदत होईल.'' आमदार जगताप म्हणाले, "मोहीम शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी दिवसाला किमान 25 घरांना स्वयंसेवकांनी भेटी देणे आवश्‍यक आहे. यासाठी जास्तीत जास्त पथकांची नियुक्ती करावी. काम करण्याऱ्या स्वयंसेवकांना मानधन द्यावे.'' आमदार लांडगे म्हणाले, "मोहिमेत सहभागी कर्मचाऱ्यांना वाढीव अतिकालीन भत्ता द्यावा. 50 वर्षांपुढील लोकांची स्वयंसेवक म्हणून नियुक्ती करू नये. स्वयंसेवकांना कोरोना योद्धा म्हणून सुरक्षा कवच द्यावे. प्रत्येक पथकात एक महिला, एक पुरुष व महापालिका कर्मचारी असावा.'' 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

स्वयंसेवक कोण होऊ शकतो 

 • किमान दहावी पास 
 • स्मार्टफोन वापराचे ज्ञान 

मोहिमेचे टप्पे 

 • पहिला : 15 सप्टेंबर ते 10 ऑक्‍टोबर 
 • दुसरा : 14 ते 24 ऑक्‍टोबर 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मोहिमेचे उद्दिष्ट्ये 

 • शहरातील 24 लाख 76 हजार 483 लोकांची तपासणी 
 • प्रत्येक नागरिकाची भेट घेऊन आजार असल्यास उपचार 
 • प्रत्येकाला आरोग्य शिक्षण देऊन ताप, खोकला, दम आदी माहिती देणे 
 • कोविड सदृश्‍य लक्षणे असल्यास दवाखान्यात दाखल करणे 
   
loading image