पिंपरी - लाडक्या गणरायाचे शनिवारी (ता. ७) घरोघरी आगमन झाले आहे. आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे. त्यात ‘सकाळ’ने शनिवारी प्रसिद्ध केलेल्या ‘माय फ्रेंड श्रीगणेशा’ पुरवणीने भर घातली आहे. त्यातील प्रश्नावली सोडवून आपल्या लगतच्या संकलन केंद्रात उत्तरपत्रिका जमा करायची आहे.
त्यातून सोडत (ड्रॉ) काढून विजेते जाहीर केले जाणार आहेत. शनिवारी (ता. १४) बक्षीस वितरण अर्थात लाडक्या बाप्पाचा प्रसाद वाचकांना मिळणार आहे. तेव्हा, पुरवणी वाचा, प्रश्नावली सोडवा, ‘सकाळ’कडे पाठवा आणि बक्षीस मिळवा...!