Talegaon-Chakan-Shikrapur Route issue
sakal
तळेगाव स्टेशन - दिवसरात्र वाहनांनी भरून वाहणारा तळेगाव-चाकण-शिक्रापूर ५४८-डी हा राष्ट्रीय महामार्ग म्हणजे आता प्रवासाचा मार्ग न राहता थेट मृत्यूकडे नेणारा सापळा ठरू लागला आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे सतत घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेत खेड आणि मावळ तालुक्यात गेल्या दशकभरात पाचशेहून अधिक नागरिकांना जीव गमवावा लागला असून, साडेसहाशेहून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.