
पिंपळे गुरव : नवी सांगवी परिसरातील मुख्य बाजारपेठेतील साई चौक, कृष्णा चौक, एम.एस. काटे चौक आणि काटेपुरम चौक या मुख्य मार्गांलगत असलेल्या पदपथांवर व्यापाऱ्यांचे अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. स्थानिक दुकानदार व फेरीवाले यांनी विक्री माल मांडल्याने पदपथ पूर्णपणे व्यापले गेले आहेत. परिणामी, वाहतूककोंडी, किरकोळ अपघात तसेच वादविवादाच्या घटनांत वाढ होत आहे.