esakal | पिंपरी-चिंचवडमध्ये निधीवरून राष्ट्रवादी-भाजप आमने-सामने 
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवडमध्ये निधीवरून राष्ट्रवादी-भाजप आमने-सामने 

गेल्या आठवड्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील शहरात आले होते. त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती. तेव्हापासून वाघेरे व शितोळे विरूद्ध महापौर उषा ढोरे व महापालिका सभागृह नेते नामदेव ढाके यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये निधीवरून राष्ट्रवादी-भाजप आमने-सामने 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी शहरासाठी 41 लाख 50 हजार रुपयांचा निधी दिला आहे. भारतीय जनता पक्षाच्या दोन कारभाऱ्यांनी किती निधी दिला ते, जाहीर करावे, असे आव्हान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे व कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी महापालिकेतील सत्ताधारी भाजपला दिले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

गेल्या आठवड्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील शहरात आले होते. त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती. तेव्हापासून वाघेरे व शितोळे विरूद्ध महापौर उषा ढोरे व महापालिका सभागृह नेते नामदेव ढाके यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राज्य सरकारने शहरासाठी अवघे दीड कोटी रुपये दिल्याचे ढोरे व ढाके यांनी प्रसार माध्यमांना सोमवारी सांगितले होते. या पार्श्‍वभूमीवर वाघेरे व शितोळे यांनी मंगळवारी भाजप पदाधिकाऱ्यांना आव्हान दिले. ते म्हणाले, "राष्ट्रवादीचे आमदार बनसोडे यांनी महापालिकेला 41 लाख 50 हजार रुपये दिले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या दोन्ही आमदारांनी किती निधी दिला, हे जाहीर करावे. राज्य सरकारने महापालिकेला 1700 कोटी रुपयांच्या खर्चासह दोन कोटी 15 लाख आणि खासगी बॅंकेच्या सीएसआर फंडातून 40 लाख रुपयांचा निधी दिला आहे.'' 

राष्ट्रवादीचे पदाधिकारी म्हणतात... 
- महापौर व पक्षनेत्यांनी स्वतःचे ज्ञान तपासून पहावे 
- शहरातील कोरोना रुग्णांसाठी बेड उपलब्ध करावेत 
- शहरात पाच हजार बेडची स्वतंत्र व्यवस्था करावी 
- कंपन्यांचे शेड तात्पुरत्या रुग्णालयांसाठी वापरावे 
- केंद्र सरकारकडून जीएसटीचा परतावा निधी आणावा