Pimpri Chinchwad : राष्ट्रवादी शहराध्यक्षांसह चार कार्याध्यक्ष बडतर्फ

राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर गेलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पिंपरी-चिंचवड शहर-जिल्हा अध्यक्षासह चार कार्याध्यक्षांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले.
Ajit Gavhane
Ajit Gavhanesakal
Updated on

पिंपरी - राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर गेलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पिंपरी-चिंचवड शहर-जिल्हा अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह चार कार्याध्यक्षांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गटाच्या वतीने पक्षातून बडतर्फ करण्याची कारवाई मंगळवारी (ता. १८) करण्यात आली आहे.

बडतर्फीची कारवाई झालेल्यांमध्ये शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, राहुल भोसले, जगदीश शेट्टी, फजल शेख यांचाही समावेश आहे. राज्यातील २१ पदाधिकाऱ्यांवर पक्षाने ही कारवाई केलेली आहे. दरम्यान, पक्षाने सोमवारी (ता. १७) पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारी समितीची स्थापना केली आहे.

यात राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष इम्रान शेख, कामगार नेते काशिनाथ नखाते, देवेंद्र तायडे, प्रशांत सपकाळ, काशिनाथ जगताप, मयूर जाधव, राजन नायर, शीला भोंडवे यांचा समावेश आहे.

शरद पवार गट ‘ॲक्शन मोड’वर

शहरातील बहुतांश पदाधिकारी अजित पवार यांच्या मागे गेले आहेत, अशा परिस्थितीत शरद पवार गटाच्या वतीने सोमवारी शहर कार्यकारी समिती नियुक्त केली तर लगेच आज शहराध्यक्षांसह चार कार्याध्यक्षांना पक्षातून बडतर्फ केले. त्यामुळे शरद पवार गट ‘ॲक्शन मोड’मध्ये आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.