मावळ भाजयुमोतर्फे शरद पवारांच्या टिप्पणीचा निषेध; पाठवली एक हजारापेक्षा अधिक पत्रे

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 July 2020

मावळ तालुका भाजप युवा मोर्चाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार यांनी केलेल्या राम मंदिरावरील खोचक टिप्पणीचा निषेध करण्यात आला.

वडगाव मावळ  (पुणे) : मावळ तालुका भाजप युवा मोर्चाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार यांनी केलेल्या राम मंदिरावरील खोचक टिप्पणीचा निषेध नोंदवून त्यांना युवा मोर्चाच्या वतीने 'जय श्रीराम' असे लिहिलेली एक हजारापेक्षा जास्त पत्रे पाठवण्यात आली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

येथील पक्ष कार्यालयात तालुका भाजपची बैठक आयोजित करण्यात आली होती. ५ ॲागस्ट रोजी अयोध्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्रभु श्रीराम मंदिराचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे  माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी सांगितले. पवार यांनी भूमिपूजन कार्यक्रमासंदर्भात केलेल्या टिप्पणीचा युवा मोर्चाच्या वतीने निषेध करण्यात आला व त्यांना 'जय श्रीराम' असे लिहिलेली पत्रे पाठविण्यात आली. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, प्रभारी भास्करराव म्हाळसकर, प्रशांत ढोरे, शांताराम कदम, संदीप काकडे, नितीन मराठे, जितेंद्र बोत्रे,  सुनील चव्हाण, किरण राक्षे , नितीन कुडे, योगेश म्हाळसकर, प्रदिप धामणकर, अविनाश गराडे,  मच्छिंद्र केदारी, विकास लिंबोरे, नामदेव  वारींगे आदी उपस्थित होते.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp president sharad pawar was protested by maval taluka bjp youth